Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानने (Taliban) भारताबद्दल त्यांच्या विचारसरणीचे पहिले उदाहरण दाखवून दिले आहे. तालिबानने भारताबरोबरची आयात आणि निर्यात (Export-Import) दोन्ही बंद केली आहे. अशरफ गनी सरकारच्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध खूप सौहार्दपूर्ण निर्माण झाले होते. भारताने अफगाणिस्तानातील अनेक विकास प्रकल्पांना प्राधान्य देत विकासाला चालना दिली होती. पण आता पूर्वीसारखेच संबंध टिकून राहण्याची फारशी आशा नाही.