comparemela.com


मुंबई (प्रतिनिधी) : ‘वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो’, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात झालेल्या ओबीसी चिंतन बैठकीमध्ये जाहीरपणे म्हटले आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी वडेट्टीवारांना खोचक टोला लगावला आहे.
‘आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार’, असे ज्येेष्ठ नेते नारायण राणे यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांनीही वडेट्टीवारांसह शिवसेनेवर प्रहार केला आहे. ‘मंत्री म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ चालतो. इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कसमध्ये असतो, नाहीतर तो वाघच नसतो. त्याला पाळीव कुत्रा म्हणतात. बाकी समझदारोंको इशारा काफी हैं,’ असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. लोणावळ्यात झालेल्या ओबीसी चिंतन बैठकीमध्ये, मी अशा भागात राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. यावर व्यासपीठावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा, असे सांगितलं. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी, ‘आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे’, असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेला टोला लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

Related Keywords

Shiv ,Rajasthan ,India ,Mumbai ,Maharashtra ,Lonavla ,Walker Tiger ,Narayan Rane ,Tiger Nana Patola ,Nitesh Rane , ,Shiv Sena ,Laughter Pickle ,ஷிவ் ,ராஜஸ்தான் ,இந்தியா ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,லோனாவ்லா ,நாராயண் றானே ,நீத்தேஷ் றானே ,ஷிவ் சேனா ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.