कोलंबो / वृत्तसंस्था
वरिष्ठ फलंदाज अँजिलो मॅथ्यूजने भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे त्याने लंकन मंडळाला बुधवारी कळवले. अलीकडेच इंग्लंड दौऱयावरील लंकन संघात त्याचा समावेश नव्हता. आपली शेवटची कसोटी मालिका त्याने बांगलादेशविरुद्ध एप्रिलमध्ये खेळली. भारत-लंका यांच्यातील 3 वनडे व 3 टी-20 सामन्यांची मालिका दि. 13 जुलैपासून खेळवली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅथ्यूज व कसोटी कर्णधार दिमुथ करुणारत्ने वार्षिक करारावर नाराज असून यापैकी मॅथ्यूजने आपण निवृत्तीचा विचार करत असल्याचे मंडळाला कळवले आहे.
Advertisements