अतिवृष्टीमुळे ८ ठिकाणी दरडी कोसळल्याने ३१ ऑगस्टपासून बंद असलेल्या कन्नड घाटातील वाहतूक बुधवारपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी ३०० वाहनांनी सुरक्षितपणे ये-जा केली. मात्र बस व ट्रक अशा अवजड वाहनांना परवानगी नसल्याने ही वाहतूक शिऊर बंगलामार्गे वळवली आहे. यामुळे औरंगाबादला जाण्यासाठी बस प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. तसेच वेळही जास्त लागत आहे. म्हसोबा मंदिरानज�