आरटीई प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ अद्यापही सुरुच

Card image cap


प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलभूत शिक्षणाच्या हक्कनुसार प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी  ऑनलाईन नोंदणी केली आहे. शाळांनी लावलेल्या नियमावलीनुसार कागदपत्रांची जुळवाजुळवीत पालकांची पळापळ सुरु असून आरटीई प्रवेश प्रक्रियेचा अद्याप गोंधळ सुरु असून प्रशासनाने दि.25 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
Advertisements
आरटीई निययानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालकांची सध्या पळापळ सुरु आहे. ऑनलाईन नोंदणी करुन प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिक्षण विभागाकडून ज्या गाईडलाईन मिळतील त्यानुसार सातारा शहरातील शाळांकडून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आरटीईचे अनुदान दिले नसल्याने प्रवेश देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यावर चर्चा होवून अनुदान देण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याची समजते. काही शाळांच्या तांत्रिक बाबी होत्या. त्याही दुर करुन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. पालकांना ज्या अडचणी भेडसावत होत्या त्या अनुषंगाने मार्गदर्शन केले जात आहे. 25 टक्के प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत, असे साताऱयाच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी जयश्री शिंगाडे यांनी सांगितले.
साताऱयातील शाळेंत झालेले प्रवेश भारत इंग्लिश मीडियम स्कूल 13, साधना प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल कोडोली 9, रघुकुल इंग्लिश मीडियम स्कूल 8, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल 10, सनशाईन नॅशनल स्कूल 5, छत्रपती शाहू ऍकॅडमी 29, गुरुकुल प्रायमरी स्कूल 34, सौ. डी. एन. छाबडा स्कूल 4, बी.व्ही.डॉ.जे.डब्ल्यू. आरयन ऍकॅडमी 23, पोतदार इंटरनॅशन स्कूल तामजाईनगर46, के. एस.डी. शानभाग विद्यालय 20, आयडीअल इंग्लिश मीडियम स्कूल 3, मेरी एन्जल इंग्लिश मीडियम स्कूल 12, वरदान पीएस स्कूल विकासनगर 7, सातारा पोलीस पब्लीक स्कूल 12, यशोदा पब्लीक स्कूल वाढे 9, शिवसह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल 4, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल 7, सराह लिना स्कूल 4, मोना स्कूल 14, प्रायमरी सैनिक स्कूल सातारा 19, डी.ई.एस.दातार शेंदूरे इंग्लिश मीडियम स्कूल कोटेश्वर मैदान 13, ब्लासम स्कूल ऍण्ड हायस्कूल सातारा 3, सातारा प्रघ्यमरी स्कूल रविवार पेठ 10, सातारा इंग्लिश मीडियम स्कूल सातारा 20, पी.ए.इंग्लिश स्कूल सातारा 7, हिंदवी पब्लीक स्कूल 18, अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल 68, रयत मराठी माध्यमिक स्कूल सातारा 12, शिवसह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल 12 असे प्रवेश झालेले आहेत, असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
Share

Related Keywords

India , Satara , School Satara , India English School , Satara English School , High School Satara , English School , National School , English School Satara , English School Field , King Bhaurao Patil English School , Alina School , Mary English School , International School , Shahu Academy , Nps School , Education The Department , Education Department , Satara School Sunday Peth , Jayashree Chestnut , Primary English School , New English School , Primary School , இந்தியா , சதாரா , ஆங்கிலம் பள்ளி , தேசிய பள்ளி , சர்வதேச பள்ளி , ப்ச் பள்ளி , கல்வி துறை , புதியது ஆங்கிலம் பள்ளி , ப்ரைமரீ பள்ளி ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.