comparemela.com


प्रतिनिधी/ बेळगाव
Advertisements
किरकोळ बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने काही प्रमाणात भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. बिनीस, घेवडा, ढबू मिरची, वांगी, भेंडी व गवार आदी भाजीपाल्यांचे दर प्रतिकिलो 50 रुपयांच्या पुढे गेले आहेत. पावसामुळे काही ठिकाणी भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक मंदावलेली आहे. त्यामुळे नागरिकांना भाजीपाल्याच्या अधिक दराचा फटका बसत आहे. आषाढी एकादशी व बकरी ईद दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने उपवासासाठी लागणारे विविध पदार्थ व फळे बाजारात दाखल झाली आहेत. शिवाय त्यांच्या मागणीतही वाढ झालेली आहे. दरम्यान, मागील आठवडय़ाच्या तुलनेत फळांच्या किमतीतही वाढ झाली आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात लाल भाजी 10 रुपयांना 2 पेंढय़ा, शेपू 10 रुपयांना 2 पेंढय़ा, कांदा पात 20 रुपयांना 5 पेंढय़ा, बिनीस 80 रुपये किलो, घेवडा 50 रुपये किलो, ढबू मिरची 60 रुपये किलो, टोमॅटो 25 ते 30 रुपये किलो, वांगी 40 रुपये किलो, बटाटा 25 रुपये किलो, भेंडी 40 रुपये किलो, कारली 40 रुपये किलो, गवार 50 रुपये किलो, कोथिंबीर 10 रु. पेंढी, शेवग्याच्या शेंगा 10 रुपये पेंढी, आलं 100 रुपये किलो, लसूण 100 रुपये किलो,  लिंबू 10 रुपयांना 8 नग असा भाजीपाल्याचा दर होता.
लॉकडाऊन काळात भाजी मोजक्मयाच वेळेत खरेदी करावी लागत होती. शिवाय आवकही कमी होती. त्यामुळे लॉकडाऊन काळात भाजीपाल्याचे दर अधिक होते. मात्र, अनलॉकनंतर वाहतूक सुरळीत झाल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याची आवक होत आहे.
महिन्याभरात खाद्य तेल दरात डब्यामागे 450 ते 500 रुपयांची घसरण
खाद्य तेलांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली होती. साधारण डब्यामागे 1000 ते 1500 रुपयांची वाढ झाली होती. मात्र, मागील महिन्याभरात खाद्य तेलांच्या प्रति डब्यामागे 450 ते 500 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या खाद्यतेलांचे दर स्थिर झाले आहेत. हेल्थफीट डबा (15 किलो) 2450 रुपये, सोयाबिन 2300 रुपये, शेंगातेल 2600 ते 2650 रुपये, सनफ्लॉवर 2350 रुपये, पामतेल 2100 रुपये असा खाद्यतेलाचा दर आहे. खाद्यतेलाचे दर वाढले होते. त्यामुळे हॉटेल, मेस व गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला होता. मात्र, आता थोडय़ाफार प्रमाणात खाद्य तेलांचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.
बाजारपेठेतील गर्दी चिंताजनक
अनलॉकनंतर सुरू झालेल्या बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी तर काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी कोरोनाच्या दृष्टिकोनातून चिंताजनक आहे. नरगुंदकर भावे चौक, रविवारपेठ, गणपत गल्ली, खडेबाजार आदी ठिकाणी खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. बाजारात येणारे नागरिक तेंडाला मास्क वापरत असले तरी सामाजिक अंतर राखण्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी कोरोनाच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे.
 
आषाढी एकादशी-बकरी ईद तोंडावर
आषाढी एकादशी व बकरी ईद तोंडावर आल्याने खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे. मंगळवारी आषाढी एकादशी आहे. त्या पाठोपाठ बुधवारी बकरी ईद असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. दरम्यान, दोन्ही सणांसाठी साहित्य व पदार्थ बाजारात दाखल झाले आहेत. विशेषकरून उपवासाच्या पदार्थांच्या मागणीत वाढ होत आहे.
Share
previous post

Related Keywords

Belgaum ,Karnataka ,India ,Bhave Square ,Oil Palm Rs ,Transport Well ,Oil Palm ,Market Citizen ,பெல்காம் ,கர்நாடகா ,இந்தியா ,எண்ணெய் பனை ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.