July 16, 2021 13 बर्मिंगहॅम : पाकविरूद्ध होणाऱया आगामी टी-20 मालिकेसाठी बुधवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने संघाची घोषणा केली असून कर्णधार इयान मॉर्गनचे पुनरागमन झाले आहे. मध्यंतरी कोरोना महामारी समस्येमुळे मॉर्गनला वनडे मालिकेला मुकावे लागले होते. पाक आणि इंग्लंड यांच्यातील यापूर्वी झालेल्या वनडे मालिकेत इंग्लंडने पाकचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेत बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. इंग्लंडच्या निवड समितीने वनडे मालिकेसाठी अनेक नवोदितांना संधी दिली होती. Advertisements इंग्लंड संघ- मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, बेअरस्टो, जॅक बॉल, बँटन, बटलर, टॉम करन, ग्रेगरी, जॉर्डन, लिव्हिंगस्टोन, सकीब मेहमूद, मलान, पार्किन्सन, रशीद, रॉय आणि डेव्हिड विली. Share