ऑनलाईन टीम / मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. Advertisements दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावे लागले होते. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सोमवारी त्यांची पत्नी सायरा बानू म्हणाल्या होत्या की ते बरे होऊन लवकरच घरी परत येतील. परंतु, आज सकाळी त्यांचे निधन झाले. दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांनी ज्वार भाटा (1944), अंदाज (1949), आन (1952), देवदास (1955), आजाद (1955), मुगल-ए-आजम (1960), गंगा जमुना (1961), क्रान्ति (1981), कर्मा (1986) आणि सौदागर (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पद्मभूषण व दादासाहेब पुरस्काराने सन्मानितसर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना 8 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टेचा सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 2015 मध्ये सरकारने त्यांना पद्मभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च सन्मानही दिला आहे. दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून 1944 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवले आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. 1998 मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. Share previous post next post