ऑनलाईन टीम / देहरादून : तीरथसिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. पुष्करसिंह धामी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. धामी हे उत्तराखंडचे सर्वात तरुण मुख्यमंत्री असतील. Advertisements धामी हे खटीमा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. भाजप विधिमंडळ मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री म्हणून धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आज राजभवनात त्यांचा शपथविधी होणार आहे. Share previous post next post