comparemela.com


July 1, 2021
10
एक्स्ट्रा टाईममध्ये 121 व्या मिनिटाला अर्तेमचा सामन्यातील निर्णायक गोल
ग्लास्गो / वृत्तसंस्था
Advertisements
एक्स्ट्रा टाईमपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत अर्तेम डोबिकच्या लेट विनर गोलमुळे युक्रेनने तुल्यबळ स्वीडन संघाला 2-1 अशा फरकाने मात दिली आणि युरो चॅम्पियनशिप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. अर्तेमने सामन्यातील 121 व्या मिनिटाला हेडरवर गोलजाळय़ाचा वेध घेतला आणि हाच या लढतीतील टर्निंग पॉईंट ठरला. आता युक्रेनची उपांत्यपूर्व फेरीतील लढत इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी होणार आहे.
वास्तविक, साखळी फेरीत केवळ 3 गुण संपादन केल्यानंतरही बाद फेरीत स्थान मिळाल्याने युक्रेनचा संघ बराच सुदैवी ठरला होता. ई गटातील शेवटच्या साखळी सामन्यात स्वीडनने पोलंडला नमवल्याने युक्रेनला अंतिम 16 मध्ये पोहोचणे शक्य झाले होते. येथील पहिल्या लढतीत मात्र त्यांनी आपले बाद फेरीत पोहोचणे फ्मल्यूक नव्हते, हे अधोरेखित केले. अँद्रिय शेवशेंकोच्या या संघाने लौकिकाला साजेसा खेळ साकारत विजय खेचून आणला.
युक्रेनतर्फे झिन्चेन्कोने 27 व्या मिनिटाला पहिला तर अर्तेम डोबिकने एक्स्ट्रा टाईममध्ये 121 व्या मिनिटाला दुसरा व निर्णायक गोल केला. स्वीडनचा एकमेव गोल इमिल फोर्सबर्गने 43 व्या मिनिटाला केला. स्वीडनच्या मार्कस डॅनिल्सनला 99 व्या मिनिटाला रेड कार्ड दिले गेले आणि त्यानंतर या संघाला उर्वरित खेळात 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले.
हॅम्पडन पार्कवरील या लढतीत युक्रेनचे चाहते फारशा संख्येने नव्हते. पण, संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर या चाहत्यांनीही स्टेडियम डोक्यावर घेण्यात कसर सोडली नाही. बाद फेरीत पोहोचलो, इथेच आमचा उद्देश साध्य झाला, असे शेवशेंकोने स्वीडनविरुद्ध लढतीपूर्वी म्हटले होते. पण, स्वीडनला पराभवाचा धक्का देत मैदानावर काहीही शक्य आहे, याचा दाखला युक्रेनने येथे दिला.
युक्रेनच्या झिन्चेन्कोने 27 व्या मिनिटाला गोलकोंडी फोडली, त्यावेळी स्वीडनचा संघ या युरो हंगामात प्रथमच एखाद्या लढतीत पिछाडीवर फेकला गेला. मात्र, इमिल फोर्सबर्गने केवळ 16 मिनिटातच संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर 90 मिनिटांच्या रेग्युलर टाईममध्ये उभय संघात 1-1 अशी बरोबरी कायम राहिली व यामुळे 30 मिनिटांच्या एक्स्ट्रा टाईमचा अवलंब केला गेला. एक्स्ट्रा टाईममध्ये 1-1 गोलबरोबरीची कोंडी कायम राहणार, असेच संकेत होते. मात्र, स्टॉपेज टाईममध्ये पहिल्याच मिनिटाला अर्तेमने चमत्कार केला आणि त्याच्या हेडरवरील गोलमुळे एकच खळबळ उडाली. त्याच्या या निर्णायक हेडरमुळे युक्रेनचा संघ दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला.
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक
तारीख / उपांत्यपूर्व लढत / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण
2 जुलै / स्वित्झर्लंड वि. स्पेन / रात्री 9.30 वा. / सेंट पीटर्सबर्ग
3 जुलै / बेल्जियम वि. इटली / रात्री 12.30 वा. / म्युनिच
3 जुलै / झेक प्रजासत्ताक वि. डेन्मार्क / रात्री 9.30 वा. / बाकू
4 जुलै / युपेन वि. इंग्लंड / रात्री 12.30 वा. / रोम
Share
previous post
next post
Related Stories

Related Keywords

India ,Denmark ,Rome ,Lazio ,Italy ,Belgium ,Sweden ,Czech Republic ,Switzerland ,Spain ,Ukraine ,Swedish , ,Sweden Union ,England Friday ,Regular Neutral ,Final Union ,Indian Standard Time ,Place July ,Saint Petersburg July ,Munich July ,இந்தியா ,டென்மார்க் ,ரோம் ,லேஸியோ ,இத்தாலி ,பெல்ஜியம் ,ஸ்வீடந் ,செக் குடியரசு ,சுவிட்சர்லாந்து ,ஸ்பெயின் ,உக்ரைன் ,ஸ்விட்ச் ,இங்கிலாந்து வெள்ளி ,இந்தியன் தரநிலை நேரம் ,இடம் ஜூலை ,முனிச் ஜூலை ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.