Spy camera in doctor lady's bedroom, bathroom pune crime new

Spy camera in doctor lady's bedroom, bathroom pune crime news | डॉक्टर महिलेच्या बेडरूम, बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा; मेमरी कार्ड, बॅकअपही सापडला


Spy Camera In Doctor Lady's Bedroom, Bathroom Pune Crime News
पुणे:डॉक्टर महिलेच्या बेडरूम, बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा; मेमरी कार्ड, बॅकअपही सापडला
पुणे18 तासांपूर्वी
कॉपी लिंक
शहरातील एका नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्‍टरच्या खोलीत स्पाय कॅमेरा लावल्याची घटना उघडकीस आली आहे. हा कॅमेरा बाथरूम आणि बेडरूममध्ये लावण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित ३१ वर्षीय महिला डॉक्टर एका नामांकित महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात काम करते. ती रुग्णालयाच्या सर्व्हिस कॉटेजमध्ये आणखी एका महिला डॉक्‍टरसह राहते. मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातील काम झाल्यानंतर ती खोलीवर आली होती. या वेळी तिने बाथरूमचे लाइट लावले असता ते सुरू झाले नाही. त्यानंतर बेडरूमचे लाइट लावले असता तेदेखील सुरू झाले नाही. यामुळे तिने इलेक्‍ट्रिशियनला बोलावले. त्याने दुरुस्ती करण्यासाठी बाथरूममधील बल्बचे होल्डर काढले असता, आत स्पाय कॅमेरे, त्याचे मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला. यानंतर बेडरूमच्या बल्बचे होल्डर काढले असता तेथेही असाच प्रकार आढळून आला. त्यानंतर तिने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाहणी केली असता सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे समजले. रखवालदारानेही येथे दुसरे कोणीही आले नसल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...
अ‍ॅप उघडा

Related Keywords

India , Pune , Maharashtra , , Kelly As Society , India University , இந்தியா , புனே , மகாராஷ்டிரா , இந்தியா பல்கலைக்கழகம் ,

© 2025 Vimarsana