Sachin Tendulkar's dream of becoming Ratnagiri's Deepti doct

Sachin Tendulkar's dream of becoming Ratnagiri's Deepti doctor will come true; Along with education, the cost of college-hostel will also be borne; news and live updates | रत्नागिरीच्या दीप्तीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न सचिन तेंडुलकर साकारणार; शिक्षणासह कॉलेज-होस्टेलचा खर्चही उचलणार


Sachin Tendulkar's Dream Of Becoming Ratnagiri's Deepti Doctor Will Come True; Along With Education, The Cost Of College hostel Will Also Be Borne; News And Live Updates
दिव्य मराठी विशेष:रत्नागिरीच्या दीप्तीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न सचिन तेंडुलकर साकारणार; शिक्षणासह कॉलेज-होस्टेलचा खर्चही उचलणार
मुंबईएका दिवसापूर्वी
कॉपी लिंक
‘सेवा सहयोग फाउंडेशन’ स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मास्टरब्लास्टरची मदत
रत्नागिरी जिल्ह्यातील झर्ये गावातील दीप्ती विश्वासराव हिने डॉक्टर व्हायचे स्वप्न मनाशी बाळगले होते. तिला गावातील पहिली डॉक्टर व्हायचे होते. यासाठी ती रात्रंदिवस कष्ट घेत होती. मात्र लहानपणापासूनच हुशार असलेल्या दीप्तीचे स्वप्न पूर्ण करण्यात अार्थिक अडचणी आडव्या येत होत्या. भारतरत्न सचिन तेंडुलकरला याबाबत माहिती मिळाली आणि त्याने तिला मदत करण्याचा संकल्प केला. सचिन तेंडुलकरने दीप्तीचे वैद्यकीय शिक्षण आणि राहण्याचा पूर्ण खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
दीप्ती दशरथ विश्वासराव हिने शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच तिने राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश परीक्षा (नीट) देखील उत्तीर्ण केली. याच आधारे तिला अकोल्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. मात्र, महाविद्यालयाचे शुल्क, वसतिगृह व दुसरे खर्च गरीब वडिलांच्या कमी उत्पन्नात पूर्ण होऊ शकत नव्हते. दीप्तीची ही माहिती सोशल मीडियाद्वारे सचिन तेंडुलकरला मिळाली. सचिनने स्वयंसेवी संस्था ‘सेवा सहयोग फाउंडेशन’च्या माध्यमातून शिक्षणाचा पूर्ण खर्च उपलब्ध करून दिला आहे.
सचिन तेंडुलकरच्या या मदतीमुळे दीप्ती आता तिच्या गावातील पहिली डॉक्टर होण्याचे पूर्ण करू शकणार आहे. शिक्षणाचा सर्व खर्च उपलब्ध करून दिल्याने सचिनची मी आभारी असल्याचे सांगत दीप्ती विश्वासराव म्हणाली की, मी परिश्रम घेत शिक्षण पूर्ण करेन आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनाही मदत करेन, असा विश्वास मी सचिनला देत आहे. इकडे, सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट टाकून दीप्तीचे अभिनंदन केले आहे. तिचा संघर्ष तिच्याप्रमाणेच इतर मुलांनाही शिक्षणासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रेरणा देईल, असेही सचिनने म्हटले आहे.
लॉकडाऊनच्या काळात कित्येक किमी पायपीट
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दीप्तीने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होतेे. लॉकडाऊनच्या काळात तिला ऑनलाइन क्लास करण्यासाठी इंटरनेट जोडणीत प्रचंड अडचण येत असे. अशा वेळी नेटवर्क मिळवण्यासाठी ती कित्येक किमी पायपीट करत असे. कोकणातील दुर्गम गावात तिच्यापर्यंत पोहोचणे सोपे नसतानाही सचिनने स्वयंसेवी संस्थेच्या अधिकाऱ्यांसह आवश्यक तेवढी आणि अगदी थोड्या वेळातच व्यवस्था केली.
बातम्या आणखी आहेत...

Related Keywords

Ratnagiri District , Maharashtra , India , Ratnagiri , Orissa , Dipti Vishwasrao , Bharats Tendulkar , Sachin Tendulkar , Tendulkar Ngos , Dipti Dasaratha Vishwasrao , Foundation Ngos , Ratnagiri District Village Dipti Vishwasrao , Her Village , ரதணகிரி மாவட்டம் , மகாராஷ்டிரா , இந்தியா , ரதணகிரி , ஓரிஸ்ஸ , சச்சின் டெண்டுல்கர் , அவள் கிராமம் ,

© 2025 Vimarsana