कडोंमपाच

कडोंमपाचे आता मोबाईल लसीकरण


कल्याण (वार्ताहर) : कल्याण – डोंबिवली मनपाने मोबाईल लसीकरणाची तयारी केली असून, त्यासाठी राज्य सरकारकडे सहा लाख डोसची मागणी केली असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे.
मनपा हद्दीत झोपडपट्टी, चाळवजा परिसरात दोन व्हॅन फिरत्या स्वरूपात लसीकरण करण्यासाठी सज्ज केल्या जाणार आहेत. एका व्हॅनमध्ये लसीकरण केले जाईल. तर, दुसऱ्या व्हॅनमध्ये लस दिलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल. त्यासाठी दिवसाला २० हजार लसींचे डोस लागलीत. राज्य सरकारने ६ लाख लसींचे डोस दिल्यास मोबाईल लसीकरण मनपाला सुरू करणे शक्य होईल. त्याचा आराखडा व नियोजन मनपाने केले आहे. दरम्यान, मनपास दररोज १२ ते १५ हजार लसींचे डोस उपलब्ध होत होते.
अत्रे रंगमंदिरातील लसीकरण केंद्रावर सोमवारी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला होता. मात्र, पुरेसे डोस उपलब्ध न झाल्याने लसीकरण मंगळवार ते गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. लसी उपलब्ध होताच लसीकरण सुरू केले जाईल. लसीकरण जास्त प्रमाणात व्हावे, यासाठी मनपाने ३३ खासगी मान्यताप्राप्त रुग्णालयांकडून मोठ्या सोसायट्यांनी त्यांच्या सभासदांचे सशुल्क लसीकरण करून घ्यावे, असे धोरण जाहीर केले होते. परंतु, केवळ पलावा येथील सोसायटीने रिलायन्स रुग्णालयाशी टायअप करून तीन हजार जणांचे लसीकरण केले. लसीचे डोस संपल्याने तेथील लसीकरणही सध्या बंद आहे. तर, अन्य सोसायट्या लसीकरणासाठी पुढे आलेल्या नाहीत. दरम्यान, कल्याण पश्चिमेत खासदार कपिल पाटील फाऊंडेशनने लसीकरण सुरू केले. त्यासाठी फाउंडेशनने लसीचे डोस विकत घेतले होते.

Related Keywords

Ashwini Patil , Mp Dev Patil Foundation , Center Monday , Patil Foundation , அஸ்வினி பாட்டீல் , மையம் திங்கட்கிழமை ,

© 2025 Vimarsana