Jammu And Kashmir Latest News Update; Explosion Inside Jammu

Jammu And Kashmir Latest News Update; Explosion Inside Jammu Airport, Jammu Airport Blast, Forensic Team Reaches The Spot; news and live updates | विमानतळाच्या तांत्रिक क्षेत्रात 5 मिनिटांत दोन स्फोट; स्फोटासाठी 2 ड्रोनचा वापर; हवाई दलाचे 2 जवान जखमी


Jammu And Kashmir Latest News Update; Explosion Inside Jammu Airport, Jammu Airport Blast, Forensic Team Reaches The Spot; News And Live Updates
जम्मू-काश्मीरमध्ये स्फोट:विमानतळाच्या तांत्रिक क्षेत्रात 5 मिनिटांत दोन स्फोट; स्फोटासाठी 2 ड्रोनचा वापर; हवाई दलाचे 2 जवान जखमी
जम्मू8 तासांपूर्वी
कॉपी लिंक
जम्मू येथून एका दहशतवाद्याला अटक
जम्मू विमानतळाच्या तांत्रिक क्षेत्राजवळ स्फोट झाल्याने आजूबाजूच्या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, 5 मिनिटांच्या अंतराने या भागात दोन स्फोट झाले. दरम्यान, पहिला स्फोट परिसरातील इमारतीच्या छतावर आणि दुसरा खाली झाला. घटनेची माहिती मिळताच हवाई दल, नौदल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. यावेळी फॉरेन्सिक टिमदेखील घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास करत आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी मध्यरात्री पावने दोन वाजेच्या सुमारास घडली असून या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकण्यात आला आहे. जिथे ही घटना घडली तेथे भारतीय हवाई दलाचे स्टेशन मुख्यालयही आहे. तसेच या भागात जम्मूतील महत्वाचे विमानतळही येत असल्याने हा भाग पूर्णपणे सीलबंद करण्यात आला आहे.
स्फोटामुळे आजूबाजूच्या भागात दहशत पसरली
संरक्षणमंत्र्यांनी परिस्थितीचा घेतला आढावा
जम्मूच्या एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या घटनेसंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एअर चीफ मार्शल एच. एस अरोरा यांच्याशी बातचित केली. दरम्यान, त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, एअर मार्शल विक्रम सिंह परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूला पोहोचत असल्याचे सांगण्यात आले आहे.
जम्मू येथून एका दहशतवाद्याला अटक
दुसरीकडे जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले असून त्यांनी नरवाल परिसरातून एका दहशतवाद्यास अटक केली आहे. त्याच्याकडून 5 किलो आयईडी (IED) जप्त करण्यात आले असून पुढील तपास अजून सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...
अ‍ॅप उघडा

Related Keywords

Jammu , Jammu And Kashmir , India , Hawaii , United States , Rajnath Singh , Protection Ministry , Defence Rajnath Singh , Jammu And Kashmir Latest News Updates , Explosion Inside Jammu Airport , Ammu Airport Blast , Orensic Team Reaches The Spot Jammu , News In Marathi , ஜம்மு , ஜம்மு மற்றும் காஷ்மீர் , இந்தியா , ஹவாய் , ஒன்றுபட்டது மாநிலங்களில் , ராஜ்நாத் சிங் , ப்ரொடெக்ஶந் அமைச்சகம் , பாதுகாப்பு ராஜ்நாத் சிங் ,

© 2025 Vimarsana