Gold, Silver rate today: डॉलरच्या तुलनेत रुपयाची ताकद आणि जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडचा परिणाम देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींवर दिसून आला. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये (Delhi Bullion Market) 18 ऑगस्ट 2021 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत (Gold rate today) 152 रुपयांनी घसरून 46,328 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. त्याचप्रमाणे चांदीच्या किमतीत (Silver rate today) घट झाली. सराफा बाजारात चांदीची किंमत 286 रुपयांनी घसरून 62,131 रुपये प्रति किलो झाली.