mumbai newsVedanta Foxconn Project : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री याबाबत फोनवर झालेल्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितला. 'मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित झाला. महाराष्ट्रात मोठे उद्योग येणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी गुणवत्ता आणि आवश्यक पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत. आम्ही त्यासाठी उद्योगांना आवश्यक त्या सवलती द्यायला तयार आहोत, असा मुद्दा मी मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडला, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.