Bollywood Actress Shilpa Shetty's Husband Raj Kundra arreste

Bollywood Actress Shilpa Shetty's Husband Raj Kundra arrested in Mumbai for making porn film and uploading it on app | पोर्न फिल्म बनवून ॲपवर अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्राला मुबंईत अटक


Bollywood Actress Shilpa Shetty's Husband Raj Kundra Arrested In Mumbai For Making Porn Film And Uploading It On App
शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक:मुंबई पोलिस आज राज कुंद्राला न्यायालयात करणार हजर; पोर्न फिल्म बनवण्याच्या आरोपावरुन सोमवारी रात्री केली होती अटक
मुंबई41 मिनिटांपूर्वी
कॉपी लिंक
संपूर्ण प्रकरण काय आहे?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली. अश्लील चित्रफिती, चित्रपट बनवून ते ॲपवर अपलोड केल्याप्रकरणी कुंद्राला अटक करण्यात आली. राज कुंद्रा हाच या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून त्याच्याविरोधात ठोस पुरावे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आज मंगळवारी सकाळी 11 वाजता मुंबई पोलिस कुंद्राला न्यायालयात हजर करणार आहे. तत्पूर्वी, कुंद्राला जेजे रुग्णालयातून पहाटे 4.15 वाजता मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात आणण्यात आले होते. पहाटे चार वाजता त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयातून मुंबईच्या जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.
जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असतानाचे फोटो
संपूर्ण प्रकरण काय आहे?
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट, चित्रफिती बनवून त्या एका ॲपवर अपलोड केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा प्रमुख सुत्रधार राज कुंद्रा असल्याचे तपासात समोर आले होते, अशी माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. राज कुंद्राला सोमवारी चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. काही तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. रात्री उशिरा त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. गुन्हे शाखेचा प्रॉपर्टी सेल कुंद्रा याची चौकशी करीत आहे.
कुंद्राविरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पूर्वी अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये कुंद्रा याच्या स्टार्टअप कंपनीतील एका कर्मचाऱ्याचाही समावेश होता. त्याला एप्रिल महिन्यात जामीन मिळाला होता. त्यानंतर जून महिन्यात कुंद्रा यानेही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
असे समोर आले प्रकरण ?
मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री गहना वशिष्ठसह सहा लोकांना अटक केली होती. त्यानंतर आणखी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर एफआयआर नोंदवला गेला होता. कथितरित्या कलाकारांना अश्लील चित्रपटांसाठी न्यूड सीन करण्यास भाग पाडले जात असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्यावेळी चित्रफिती पेड मोबाइल अप्लिकेशनवर रिलीज करण्यात येत असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनीयाप्रकरणी उमेश कामत नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. कामच्या अटकेनंतर चौकशीत या प्रकरणाचा प्रमुख सुत्रधार राज कुंद्रा असल्याचे तपासात समोर आले आहे.
बातम्या आणखी आहेत...

Related Keywords

Mumbai , Maharashtra , India , Raj Kundra , Shilpa Shetty , Crime Branch Property , Crime Branch , Raj Monday , மும்பை , மகாராஷ்டிரா , இந்தியா , ராஜ் குந்த்ரா , ஷில்பா ஷெட்டி , குற்றம் கிளை ,

© 2025 Vimarsana