Bjp Leader Keshav Upadhye Comment On Nana Patole News And Live Updates फोन टॅपिंग प्रकरण:ना सत्तेत काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला... नानाजी काय तुमची अवस्था?; भाजपचा पटोलेंना टोला मुंबई16 तासांपूर्वी कॉपी लिंक पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केले होते खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत फोन टॅपिंग प्रकरणावरुन खळबळजनक आरोप केले होते. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच टीकाटीपण्णी सुरु आहे. नानाजी काय तुमची अवस्था? काँग्रेसमुळे जे सत्तेत आले तेच प्रदेशाध्यक्षाविरोधात काम करत आहे. थेट प्रदेशाध्यक्षांवर पाळत... तरी काँग्रेस गप्प? असा टोला भाजपचे महाराष्ट्रातील मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, सत्तेत काँग्रेसला कोणी विचारत आहे. ना काँग्रेसमध्ये तुम्हाला असे चित्र आहे हे असेदेखील उपाध्ये यांनी म्हटले आहे. यामुळे काँग्रेस आणि भापजमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काय म्हणाले होते पटोले? महाराष्ट्राच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनादरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालिन सरकारवर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले की, वर्ष 2016-17 मध्ये माझ्यावर पाळत ठेवले गेली असून माझे फोन याकाळात टॅप करण्यात आले होते. दरम्यान, माझा कोड 'अमजद खान' असा ठेवला गेला असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी सभागृहात केला होता. त्यासोबतच दानवेंचा पीए आणि खा. काकडे यांचादेखील फोन टॅप करण्यात आला असल्याचे ते म्हणाले होते. गृहमंत्र्यांनी दिले होते चौकशीचे आदेश सभागृहात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेतली होती. दरम्यान, वळसे पाटील यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आदेश देण्यात येईल असे सभागृहात बोलताना सांगितले होते. बातम्या आणखी आहेत... अॅप उघडा