comparemela.com


मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्यात काडीमोड झाला आहे. एकमेकांच्या सहमतीने त्यांनी घटस्फोट घेतला असून खुद्द आमीर खानने ही माहिती दिली आहे. आमीर खान आणि किरण राव हे १५ वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले होते. दोघांनीही आझाद नावाचा एक मुलगा आहे.
दोघांनी अधिकृतरित्या एक निवेदन जारी करत विभक्त झाल्याचे स्पष्ट केले आहे. १५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचे नाते विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिले. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू” असे आमीर आणि किरणने म्हटले आहे. मुलाचा सांभाळ करण्यासोबत आम्ही फिल्म, पाणी फॉउंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर अनेक प्रोजेक्टवर पुढेही एकत्र काम करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
पहिली भेट ‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमीर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक होती. आमीर आणि किरणने २८ डिसेंबर २००५मध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११मध्ये सरोगसीच्या मदतीने मुलगा आझादचा जन्म झाला होता.
किरण रावशी आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. या आधी २००२मध्ये आमीर आणि अभिनेत्री रीना दत्त विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमीरला आयला आणि जुनेद ही दोन मुले आहेत.

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India ,Aamir Khan ,Kiran Rao , ,Project Next ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,அமீர் காந் ,கிறன் ராவ் ,ப்ராஜெக்ட் அடுத்தது ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.