काँग्रेस स्थापना दिनी (congress foundation day) यावर्षी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi), खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) मुंबईत (Mumbai) असणार आहेत. शिवाजी पार्कवर राहुल गांधी सभा घेणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. काँग्रेसला (Congress) संपवायला निघालेलेच संपलेत, अशी टीका त्यांनी भाजपवर (BJP) केली.