झारखंडमध्ये राज्य पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाला एका खतरनाक माओवाद्याला अटक करण्यात मोठे यश मिळाले आहे. 30 पोलिसांच्या हत्येत सहभागी असलेला डेंजर नक्षलवादी रमेश गंजू (Maoist Ramesh Ganjhu) तथा आझाद याला काल गुरुवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर 45 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर 15 लाखांचे बक्षीस लावण्यात आले होते.