वृत्तसंस्था/ ट्रेंटब्रीज
शुक्रवारी येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात पाकने यजमान इंग्लंडचा 31 धावांनी पराभव करून मालिकेत विजयी सलामी दिली. या सामन्यात इंग्लंडच्या लिव्हींगस्टोनचे 42 चेंडूतील जलद शतक वाया गेले. पाकतर्फे कर्णधार बाबर आझम आणि उपकर्णधार मोहम्मद रिझवान यांनी 15 षटकांत सलामीच्या गडय़ासाठी 150 धावांची दमदार भागीदारी केली. पाक संघाला इंग्लंडच्या दौऱयात वनडे मालिक�