comparemela.com


मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता आणि भीती वर्तविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्या लाटेमुळे लहान मुलांना अधिक बाधा होऊ शकते, हा वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील लहान मुलांचे रक्त नमुने विषयक (सेरोलॉजिकल) सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांमध्ये ‘कोविड-१९’ प्रतिपिंड (अँटीबॉडीज) विकसित झाल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत अँटीबॉडीज असलेल्या लहान मुलांची संख्यादेखील जास्त आढळली असून मुंबईकरांसाठी हे दिलासादायक आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना आणि बालकांना देखील कोविड – १९ विषाणूचा धोका पोहोचू शकतो, ही बाब लक्षात घेऊन, कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यानच लहान मुलांचे रक्त नमुने विषयक सर्वेक्षण करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिले होते.
त्यानुसार १ एप्रिल २०२१ ते १५ जून २०२१ दरम्यान लहान मुलांचे सेरोलॉजिकल सर्वेक्षण करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने नायर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीव वैद्यकीय निदान प्रयोगशाळा यांनी संयुक्तपणे हे रक्त नमुने विषयक (सेरोलॉजिकल) सर्वेक्षण राबविले. वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी चाचणी करण्याकरिता संपूर्ण मुंबईतून आलेल्या रक्त नमुन्यांमधून विभागनिहाय नमुने घेऊन हे सर्वेक्षण राबविण्यात आले.
मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभाग मिळून एकूण २ हजार १७६ अनोळखी रक्त नमुने वेगवेगळ्या वैद्यकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले. त्यामध्ये महानगरपालिकेच्या स्वत:च्या चिकित्सा वैद्यकीय प्रयोगशाळांच्या विविध शाखा आणि नायर रुग्णालय यांच्या माध्यमातून १ हजार २८३ आणि खासगी २ वैद्यकीय प्रयोगशाळांतून ८९३ रक्त नमुने संकलित करण्यात आले.
चौथ्या सिरो सर्वेक्षणात दिलासादायक चित्र
मुंबईतील ५१.१८ टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. त्यापैकी, महानगरपालिकेच्या प्रयोगशाळांतील ५४.३६ टक्के, तर खासगी प्रयोगशाळांतील ४७.०३ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत. वयवर्षे १० ते १४ या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे ५३.४३ टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत. वयोगटानुसार विचार करता वयवर्ष १ ते ४ गटामध्ये ५१.०४ टक्के, ५ ते ९ वयोगटामध्ये ४७.३३ टक्के, १० ते १४ वयोगटामध्ये ५३.४३ टक्के, १५ ते १८ वयोगटामध्ये ५१.३९ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. वय १ वर्ष ते १८ पेक्षा कमी, या वयोगटाचा विचार केल्यास ही सरासरी ५१.१८ टक्के इतकी होते.

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India ,Iqbal Singh , ,Corporation Commissioner Iqbal Singh ,Corporation Commissioner ,West Suburban ,Mumbai The ,Medi Cal ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,இக்ப்யால் சிங் ,நிறுவனம் ஆணையர் ,மேற்கு புறநகர் ,மும்பை தி ,மேதி கலோரி ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.