Theft One Thousand Five Hundred Notes From The Currency Note Press Nashik
नाशिक:करन्सी नोट प्रेसमधून पाचशेच्या एक हजार नोटा गेल्या चोरीला, पाेलिसांत गुन्हा दाखल
नाशिक14 तासांपूर्वी
कॉपी लिंक
अभेद्य सुरक्षा कवच असलेल्या आणि माणूसच काय, तर साधे चिटपाखरूही प्रवेश करून चोरी करू शकत नाही आणि कोरोना काळातही अहोरात्र काम करून देशाला चलनी नोटा पुरवण्याचे काम करणाऱ्या नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसमधून पाचशे रुपयांच्या एक नाही, दोन नाही, तर तब्बल एक हजार नोटा चोरी गेल्या आहेत. त्यामुळे प्रेसची सुरक्षा पुन्हा वाऱ्यावर आल्याची चर्चा नाशिकरोड परिसरात सुरू झाली होती. याबाबत करन्सी नोट प्रेसचे सहायक प्रबंधक (विधी) अमित सतीश शर्मा (२८) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात नोटा चोरीबाबत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तेलगी प्रकरणानंतर नोटप्रेस पुन्हा चर्चेत आले आहे. प्रशासनाने या प्रकरणाबाबत काही कामगारांची चौकशी करून त्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आल्याची चर्चा आहे.
याबाबत पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी आणि सीएनपीचे सहायक प्रबंधक अमित सतीश शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिकरोड जेलरोड मार्गावरील करन्सी नोट प्रेसमधून ५०० रुपयांच्या १ हजार नोटा म्हणजे पाच लाख रुपये हे चोरीला गेले आहेत. प्रेसमध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नसल्याने पॅकिंग बे सेक्शन, एखादा प्रेस कामगार, स्टाफ किंवा सुरक्षा रक्षकापैकी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हा प्रकार १२ फेब्रुवारी २०२१ पासून उघडकीस आला होता. मात्र प्रेसच्या अंतर्गत गोपनीय तपास सुरू होता. यामध्येही नोटांबाबत काहीही सुगावा लागला नाही.
बातम्या आणखी आहेत...