comparemela.com


सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : येथील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसराची डागडुजी व दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. पुतळा नजीकच्या भरावाचा भाग मुसळधार पावसामुळे ढासळला असून याबाबत प्रशासनाने दखल घेतली आहे.
जोरदार पावसामुळे ढासळत असलेल्या चबुतऱ्यावर आता प्लास्टिकचे आच्छादन करण्यात आले आहे. शिवछत्रपतींचा हा पुतळा व त्या सभोवतालचा परिसर व सिंधुनगरीचे हे प्रवेशद्वार कायम सुशोभित राहावे म्हणून सिंधुनगरी नवनगर विकास प्राधिकरणाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ओरोस फाटा येथील शिवस्मारकाची दुरुस्ती करण्याकडे वारंवार लक्ष वेधून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर या स्मारकाचा काही भाग कोसळला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नसून संपूर्ण भारताचे दैवत आहेत. त्यांच्याच प्ररणेतून महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. याबाबत प्रेरणा मिळावी म्हणून महाराष्ट्रात जागोजागी शिवस्मारक उभारण्यात आली आहेत. त्याच उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानीत ओरोस फाटा हे स्मारक उभारले आहे; परंतु दुर्दैवाने प्रशासन याची देखभाल करीत नाही.

Related Keywords

India ,Chhatrapati Shivaji ,Oros Branch ,Shiv Chhatrapati ,India God ,Maharashtra Europe ,இந்தியா ,சத்ரபதி சிவாஜி ,ஷிவ் சத்ரபதி ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.