मुंबई/प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाडमधील तळीये गावची पाहणी केल्यानंतर ते आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. आज सकाळी १० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून चिपळूणकडे रवाना झाले आहेत. यावेळी ते पूरग्रस्त भागाची पाहणी करतानाच स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने चिपळूणसाठी रवाना झाले आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी १२.२० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी २.४० वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होतील.
दरम्यान अतिवृष्टीनं तळीये गावात होत्याचं नव्हतं करून टाकलं. गुरूवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तळीये गावावरच दरड कोसळली. या ३५ पैकी ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याने गिळंकृत केली. अचानक ओढवलेल्या या संकटाने तळीये गावावर दुःखाचा डोंगरच कोसळला. सध्या तळीये गावात मदत व बचावकार्य सुरू असून, एनडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली गाडलेल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी तळीये गावाला भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर दुःखाने कोलमडून गेलेल्या ग्रामस्थांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर दिला. राज्यात परिस्थिती उद्भवत असून, जल आराखडा तयार करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
Advertisements
previous post
next post
Related Stories