प्रतिनिधी / कणकवली:
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे ज्येष्ठ सदस्य, भास्कर आप्पाजी सावंत (71) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
Advertisements
मूळ नरडवे-पिंपळवाडी येथील भास्कर सावंत हे सध्या कणकवली शहरातील कनकनगर येथे राहत होते. सेवानिवृत्तीनंतर ते अखिल नरडवे ग्रामोद्धार संघाच्या शालेय समितीचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. राट्रपती पदक प्राप्त माजी प्राथमिक शिक्षक व अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. त्यांनी कणकवली व देवगड तालुक्यात सेवा बजावली. कसवण शाळा नं. 2 येथे कार्यरत असताना त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. संघटनेच्या माध्यमातून आजी माजी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध आंदोलनात सहभागी होणारे अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Share