comparemela.com


प्रतिनिधी/ रत्नागिरी
 डॉ. बी. एन. पाटील यांची रत्नागिरी जिह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
Advertisements
  या काळात त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली होती. त्यांनी जळगाव जिह्यात केलेल्या कामांमुळे स्वच्छता अभियाना अंतर्गत जलश्री मंत्रालयाचा पुरस्कार, जिल्हा परिषदेत पेपरलेस काम केल्यामुळे कोच पुरस्कार, अमळनेर तालुक्यातील अनोरे येथे केलेल्या कामामुळे जलसंधारण पुरस्कार, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत केलेल्या कामामुळे महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार मिळाला. दरम्यान, डॉ. पाटील यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत ऑनलाईन संगणकीकरण काम केले. तसेच जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकाऱयांची ऑनलाईन हजेरी प्रणाली लागू केली. ज्या गावांना पाणीपुरवठय़ाची सोय नव्हती, अशा गावांना पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात त्यांना यश आले. अशा विविध प्रकारे त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केली.
Share
previous post
next post

Related Keywords

Ratnagiri ,Orissa ,India ,Jalgaon ,Maharashtra , ,District The Council ,District Council ,He Jalgaon District The Council ,Patil Ratnagiri New Collector ,New Collector ,Council Ceo ,Maharashtra Government ,Zila Parishad ,Water Supply ,ரதணகிரி ,ஓரிஸ்ஸ ,இந்தியா ,ஜல்கான் ,மகாராஷ்டிரா ,மாவட்டம் சபை ,புதியது ஆட்சியர் ,சபை சிஇஓ ,மகாராஷ்டிரா அரசு ,ஜில பரிஷாத் ,தண்ணீர் விநியோகி ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.