July 13, 2021
15
प्रतिनिधी/ रत्नागिरी
Advertisements
शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील 9 विद्यार्थ्यांची पुण्याच्या सिरम इस्टिटय़ूटमध्ये निवड झाली आह़े त्यामुळे रत्नागिरीतील विद्यार्थी आता कोविडचा मुकाबला करणाऱया कोविशिल्ड लस निर्मितीसाठी हातभार लावत आहेत़ यामुळे रत्नागिरीचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आह़े
जगभरात विविध लसींची निर्मिती करणाऱया सिरम इस्टिटय़ूटमध्ये कोविडवर परिणामकारक ठरणाऱया कोवीशिल्डची निर्मिती करण्यात येत आह़े जगभरामध्ये मोठय़ा प्रमाणात मागणीमुळे या लसीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात सुरु आह़े या उत्पादनादरम्यान सिरम इस्टिटयुटला मोठय़ा प्रमाणात पात्र मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे थेट सिरमच्या रिसोर्सकडून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामध्ये विचारणा करण्यात आल़ी त्यामध्ये सुक्ष्म जीव शास्त्राचे सहा व जैवतंत्रज्ञान शास्त्राचे तीन अशा एकूण नऊ मुलांची मुलाखतीने निवड करण्यात आली आह़े सुक्ष्म जीवशास्त्राचे केदार मालये, अमोल जोशी, चिन्मय कुलकर्णी, सुवेल पावरी, अश्विन सावंत, सुधांशू पालांडे तर जैवतंत्रज्ञान शाखेचे स्वप्निल शिंदे, कृष्णा मोरे व प्रकाश चव्हाण यांचा या नऊ जणांमध्ये समावेश आह़े
निवड झालेली बहुतांश विद्यार्थीं एप्रिलपासून टप्प्याटप्याने इस्टिटय़ूटमध्ये दाखल झाले आहेत. लसीचे उत्पादन व गुणवत्ता नियंत्रण विभागात कार्यरतदेखील झाले आहेत़ निवड झालेल्या सर्व विद्यार्थींचे तसेच प्लेसमेंट विभागाचे ड़ॉ प्ऱा रुपेश सावंत, ड़ॉ प्ऱा उमेश संकपाळ व ड़ॉ प्ऱा नितीन पोदार व प्राचार्य प़ी प़ी कुलकर्णी यांचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी कौतुक केले आह़े
Share