comparemela.com


July 9, 2021
11
उच्चपदस्थ सिंधुसुपुत्र एकवटले : विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार : जिल्हय़ात पहिलाच उपक्रम
विद्यार्थ्यांना समजणार यशाचे गणित
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
Advertisements
कोकणातील ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे, प्रेरणा मिळावी, त्यांना देशातील व राज्यातील उच्च पदस्थ अधिकाऱयांचे मार्गदर्शन मिळावे व स्पर्धा परीक्षा ही एक चळवळ होऊन त्यातून कोकणातील गुणवत्तेला मोठी चालना मिळावी, या उद्देशाने आता भारतीय प्रशासकीय सेवेतील तसेच देश-विदेशातील विविध क्षेत्रात अतिउच्च पदावर काम करणारे सिंधुदुर्गचे सुपुत्र एकत्र आले आहेत.
कोकणातील गुणवत्तेला चालना देण्यासाठी पुढे आलेल्या या सिंधुदुर्गच्या सुपुत्रांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील आय. ए. एस., आय. पी. एस., आय. आर. एस., आय. एफ. एस., भारतीय सैन्य दलातील उच्च पदावर पोहोचलेले अधिकारी, केंद्रीय पोलीस दलातील उच्च अधिकारी, या व्यतिरिक्त बँकिंग, वैद्यकीय, कृषी, शिक्षण, क्षेत्रातील अतिउच्च पदावर पोहोचलेल्या सिंधुसुपुत्रांचा समावेश आहे.
कोकण हा प्रांत गुणवत्तेचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. त्यातील सिंधुदुर्ग हा जिल्हा तर शालेय शिक्षणात अग्रस्थानावर आरुढ असतो. मात्र एवढी प्रचंड गुणवत्ता ठासून भरलेली असली, तरी सिंधुदुर्गातील, या कोकणातील मुले विविध स्पर्धा परीक्षांपासून नेहमीच दूर राहात आली आहेत. अपवाद वगळता कोकणातील गुणवत्ता अतिउच्चपदावर पोहोचलेली फारशी आढळत नाही. गुणवत्ता असूनही कोकणात स्पर्धा परीक्षांचे वातावरण नसल्यामुळे, स्पर्धा परीक्षांबाबत विशेष असे मार्गदर्शन, विशेष अशी जागृती नसल्यामुळे कोकणातील ही गुणवत्ता स्पर्धा परीक्षांपासून कोसो दूर राहिली आहे. नाही म्हणायला याच कोकणातील, याच सिंधुदुर्गातील जी अपवादात्मक मुले स्वत:च्या जिद्धीने पुढे सरसावली, त्यांनी पुढे प्रचंड यश मिळवलं. या मुलांनी यूपीएससी, एमपीएससी, एनडीए., शॉर्ट सर्व्हिस कमिशन, बँकिंग, रेल्वे, वैद्यकीय, संशोधन, कृषी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये अभूतपूर्व यश मिळवत आपल्या सिंधुदुर्गचा, या कोकणचा झेंडा अटकेपार फडकावला. आता हिच सर्व आपल्या सिंधुदुर्गची सुपुत्र मंडळी या मातीचे ऋण फेडण्यासाठी, आपल्या कोकणात स्पर्धा परीक्षांचे बीज पेरण्यासाठी एकत्र आली आहेत.
अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रात अतिउच्च पदावर कार्यरत असलेल्या अमेरिकास्थित सुषमा ठाकुर व तरुण भारतचे आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांच्या संकल्पनेतून हा नवा उपक्रम वास्तवात येत आहे. यासाठी मिशन आय. ए. एस. जळगाव – खानदेशचे प्रवीण पवार यांचे सहकार्य मिळत आहे. या उपक्रमांतर्गत दर पंधरवडय़ातून एका रविवारी झूम मिटिंग, फेसबूक लाईव्ह, यू-टय़ूब माध्यमातून सिंधुदुर्ग व कोकणसह राज्यभरातील मुलांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन व प्रेरणादायी व्याखाने आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमात ज्या युवकांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी https://www.inspirationalbeings.com/contact या लिंकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गच्या टॅलेंटला दिशा देण्यासाठी एकवटलेल्या या सिंधुसुपुत्रांमध्ये डॉ. राजीव रेडकर (आय. ए. एस.), प्रतिभा पारकर (आय. एफ. एस.), सुषमा तायशेटे (आय. ए. एस.), रविकिरण गोवेकर (आय. एफ. एस.),  क्रांतीकुमार खक्कर (ग्रूप कॅप्टन, भारतीय वायुसेना), राजीव पांडे (आय. पी. एस.), संजीव पटवर्धन (लेफ्ट. कर्नल, भारतीय आर्मी), प्राजक्ता ठाकूर (आय. आर. एस.), अमित खटावकर (आय. आर. एस.), अभय पाटील (कमांडंट, सेंट्रल पोलीस), किरण चव्हाण (आय. पी. एस.), नेहा देसाई (आय. आर. एस.), सुब्रमण्य केळकर (आय. पी. एस.), देवदत्त गवाणकर (स्टेट बँक, अमेरिका), ऍड. गौतम गवाणकर, निखिल मोरे (स्पेस इंजिनिअर, जर्मनी) यांचा सामावेश आहे. त्याचबरोबर आपल्या सिंधुदुर्गात सेवा बजावलेले आय. एफ. एस. अधिकारी नरेश झुरमुरे यांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त आणखी अनेकजण या उपक्रमात सहभागी होत आहेत. तसेच कोकण बाहेरील अधिकारी मंडळी देखील मार्गदर्शन करणार आहेत. लवकरच हा उपक्रम सुरू होणार आहे.
Share
previous post

Related Keywords

Germany ,Italy ,Konkan ,Maharashtra ,India ,Jalgaon ,Abhay Patil ,Rajiv Pandey ,Sanjeev Patwardhan ,Neha Desai ,Indian Air ,India Army ,Service Commission ,India Admin Services ,Konkana Province Center ,Districta District If School ,India Military ,Intel ,Italy District ,India Military Force ,Province Center ,District If School ,Facebook Live ,Indian Air Force ,Nikhil More ,ஜெர்மனி ,இத்தாலி ,கொங்கன் ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,ஜல்கான் ,ராஜீவ் பாண்டே ,நேஹா தேசாய் ,இந்தியன் அேக ,இந்தியா இராணுவம் ,சேவை தரகு ,இன்டெல் ,மாகாணம் மையம் ,முகநூல் வாழ ,இந்தியன் அேக படை ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.