July 5, 2021
8
उत्तराखंडमध्ये अवघ्या चार महिन्यात मुख्यमंत्री बदलावा लागण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे तर राहुल आणि प्रियांका गांधी यांनी पंजाबमधील निवडणूक हरण्याचा जणू विडाच उचलला आहे अशी कुजबुज पक्षात सुरू झाली आहे.
हसावे की रडावे असाच हा प्रकार आहे. भाजप नेतृत्वाला झाले आहे तरी काय असा साहजिकच प्रश्न पडावा अशा घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचे ‘पोस्टर बॉय’ अशी प्रतिमा निर्माण झालेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीच श्रे÷ाrंनी पंगा घेतला आहे. तर शेजारील ‘देवभूमी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पर्वतीय राज्य उत्तराखंडमध्ये अवघ्या चार महिन्यात मुख्यमंत्री बदलावा लागण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे खासमखास मानले गेलेले तिरथसिंग रावत यांनी आपला राजीनामा दिलेला आहे आणि त्याचबरोबर पक्षाला झाले आहे तरी काय अशी कुजबुज नि÷ावंतांमध्येदेखील सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 8-9 महिन्यात निवडणुका आहेत. अशावेळी अशा घटना घडत असतील तर त्या भाजपला अपशकुन म्हणूनच मानल्या जातील. उत्तर प्रदेशचा डोंगराळ भाग काढून त्याचे वेगळे उत्तराखंड राज्य 20 वर्षांपूर्वी बनवण्यात आले तेव्हापासून तिथे दर पाच वर्षांनी सरकारे बदलली आहेत. भाजप आणि काँग्रेसची आलटून पालटून सरकारे आली आहेत. हा एक प्रकारचा अलिखित नियम जर पाळला गेला तर पुढील वषी फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱया निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सरकार येणार हे ठरलेले आहे. अशावेळी भाजपने नेतृत्वाच्या निर्णयाबाबत अशी घिसाडघाई का केली असा प्रश्न विचारला जात आहे.चार महिन्यापूर्वी त्रिवेंद्रसिंग रावत यांना नारळ देऊन लोकसभेचे सदस्य असलेले तिरथसिंग यांना मुख्यमंत्री बनवले गेले तेव्हा या विषयाचा साधकबाधक विचारच केला गेला नाही असे आता दिसत आहे. भाजप आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार नुकताच मरण पावल्याने पुढील दोन महिन्यात तिथे पोटनिवडणूक होऊ शकते. पण या दोन्ही ठिकाणाहून तिरथसिंग निवडून येऊ शकत नसल्याने पुष्करसिंग धाम या आमदाराला नवीन मुख्यमंत्री बनवण्यात आलेले आहे. ‘चार महिने में तीन मुख्यमंत्री। भाजप हैं तो मुमकिन हैं ।’ अशी फक्कड घोषणाच अनायासे विरोधी पक्षांच्या हाताला लागली आहे.
Advertisements
कोरोनाची महामारी वाढत असताना हरिद्वारमधील कुंभमेळय़ाच्या आयोजनाने भाजपचे उत्तराखंड सरकार, केंद्र सरकार तसेच सत्ताधारी पक्ष अडचणीत आलेला आहे. पुढील सरकार काँग्रेसचेच बनणार अशी ठाम धारणा राज्यातील पक्षनेत्यांची झाली असल्याने निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनण्यासाठी राज्यातील नेत्यात आत्ताच चढाओढ सुरू झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघातून हरलेले तत्कालीन मुख्यमंत्री हरिश रावत आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत तर पाच वेळा आमदार असलेले प्रदेशाध्यक्ष प्रीतमसिंग यावेळी आपली टोपी रिंगणात फेकणार हेही स्पष्ट होत आहे. ’बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ असा प्रकार समजला तरी तो जोरदारपणे सुरू झाला आहे. पंजाबमध्ये ‘हात’ दाखवून अवलक्षण
काँग्रेसमधील स्थिती फारशी निराळी नाही. राहुल आणि प्रियांका गांधी यांनी पंजाबमधील निवडणूक हरण्याचा जणू विडाच उचलला आहे अशी कुजबुज पक्षात सुरु झाली आहे. आजमितीला बघितले तर काँग्रेसची पंजाबमधील स्थिती अतिशय चांगली आहे कारण तिचे प्रतिस्पर्धी असलेले अकाली दल, भाजप आणि आम आदमी पक्ष वेगवेगळय़ा कारणांमुळे कमजोर आहेत. शेतकऱयांच्या आंदोलनाने भाजपा पंजाब आणि हरियाणामध्ये बेजार झालेली आहे तर अकाली दलाने आपली विश्वासार्हता गमावली आहे. अरविंद केजरीवाल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत काही दहशतवादी संघटनांशी साटेलोटे केले होते असा संशय पंजाबी माणसात आहे. अशावेळेस मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसकरता विजयश्री सहजरित्या खेचून आणू शकतात असे वातावरण आहे असे मानले जाते. पण या कहाणीमध्ये अचानक ट्विस्ट आला आहे आणि तो देखील राहुल आणि प्रियांका गांधींच्या अट्टहासामुळे. अमरिंदर सिंग हे पतियाळाच्या राजघराण्यातील असल्याने ते गांधी परिवाराला फारसे कधी विचारतच नाहीत. एकदा का मुख्यमंत्री झाले की ते हाय कमांडला जवळजवळ विसरतात आणि आपली मनमानी चालू ठेवतात. यावेळी काँग्रेसला पोषक वातावरण असल्याने एकदा निवडणूक झाली की अमरिंदर यांना नारळ देऊन त्यांच्या जागी त्यांचे ठाम विरोधक नवज्योतसिंग सिद्धूला मुख्यमंत्री बनवायचा चंग राहुल-प्रियांकानी बांधला आहे. सध्या पंजाब काँग्रेसबाबाबत जे चर्चेचे गुऱहाळ दिल्लीत सुरू आहे त्यामागे हे राजकारण आहे. अमरिंदरसिंग हे कच्चा गुरुचे चेले नाहीत. त्यांनी भारतीय लष्करातदेखील काम केले असल्याने ते संकटांना अथवा वादाला घाबरत नाहीत. पुढील वषी 80 वर्षाचे होत असले तरी त्यांना सत्ता सोडायची नाही. जर नवज्योत सिद्धूचे घोडे राहुल-प्रियंकाने पुढे दामटले तर अमरिंदर काँग्रेसला एनकेन प्रकारेण अपशकुन करतील हे ठरलेले आहे. बंडखोरांना उभे करून ते पक्षाच्या उमेदवारांना पाडतील अथवा सरळ सरळ एखादा प्रादेशिक पक्ष उभारून काँग्रेसची हवा काढून घेतील. अमरिंदर यांचे काँग्रेसमधील काही विरोधकदेखील सिद्धू हे भाजपमधून आले आहेत म्हणून ताबडतोब त्यांना मुख्यमंत्री करण्याची घाई करू नये अशी श्रे÷ाrंना विनवणी करत आहेत. सध्यातरी श्रे÷ाrंना पराभवाचे डोहाळे लागल्याचे दिसत आहे.
मोदी-शहा यांच्या पुढील वाढती आव्हाने
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्या नशिबाचे फासे अचानक पलटू लागले आहेत असे दिसत आहे. कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेने मोदी सरकार तसेच भाजपला एक जोरदार दणका दिलेला आहे. त्यातून परिस्थिती थोडी सावरू लागली आहे असे दिसत असतानाच महाभयानक अशी तिसरी लाट येणार आहे अशी भाकिते तज्ञ लोक करू लागले आहेत. अर्थव्यवस्थेचे तीन तेरा झाले आहेत. गरिबी आणि भूक वाढू लागली आहे. दुष्काळात तेरावा महिना यावा तद्वत राफेल लढाऊ विमान खरेदीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा परत जोर पकडू लागला आहे. फ्रान्समध्ये त्याबाबत एक न्यायालयीन चौकशी सुरू झाली आहे. मोदींच्या विरोधात परत रान उठण्याला सुरुवात झाली आहे.
सुनील गाताडे
Share