नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हैदराबादस्थित ‘भारत बायोटेक’च्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱया चाचणीचे परिणाम समोर आले आहेत. त्यानुसार ही लस कोरोना विरोधात 77.4 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात ही लस 65.2 टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोव्हॅक्सिनमध्ये कोरोना व्हायरस विरोधात अँटिबॉडी तयार करण्यासाठी प्रतिरक्षा प्रणाली उत्तेजित करण्याची क्षमता योग्य असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी कोव्हॅक्सिन ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि कोरोनावर प्रभावी असल्याचा निष्कर्ष ‘एनआयएच’ या अमेरिकन संस्थेनेही केला आहे.
Advertisements
कोरोनाच्या गंभीर स्वरुपातील संक्रमणाविरोधात ही लस 93.4 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. असिम्टोमॅटिक प्रकारात ही लस 63 टक्के प्रभावी आहे. कंपनीने आपल्या तिसऱया फेजच्या चाचणीमध्ये 18 ते 98 वर्षे वयोगटातील 25 हजार 800 स्वयंसेवकांना सहभागी करून घेतले होते. देशभरातील 25 ठिकाणी याची चाचणी घेण्यात आली आहे. डेल्टा व्हेरिएंट हा भारतातील कोरोनाच्या दुसऱया लाटेला जबाबदार आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकडय़ात मोठी वाढ झाली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या माध्यमातून मोहीम सुरू आहे.
यापूर्वीही प्रभावशीलता सिद्ध
कोव्हॅक्सिन ही लस भारतात सापडणाऱया डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असल्याचे पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने एका संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून या आधीच स्पष्ट केले आहे. तसेच अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थने केलेल्या एका संशोधनातूनही कोव्हॅक्सिन लस कोरोना विषाणूच्या अल्फा आणि डेल्टा दोन्ही रुपांवर प्रभावी ठरत असल्याचे दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मदतीने हैदराबादस्थित ‘भारत बायोटेक’ कंपनीने कोव्हॅक्सिन लस बनवली आहे.
लसीकरणासाठी वापर वाढणार
गेल्या दोन-चार महिन्यात भारतात कोरोनाच्या दुसऱया लाटेने कहर केला होता. आता ही लाट ओसरत आली आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. या नवीन डेल्टामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. याचदरम्यान, भारतात विकसित झालेल्या या लसीने परिणामकारकतेचे उत्तम निकष पूर्ण केल्यामुळे पुढील काळातही या लसीचा वापर देश-विदेशात वाढण्याची शक्यता आहे.
Share
previous post
next post
Related Stories