comparemela.com


July 4, 2021
27
माजी आमदार नरेंद्र पाटील करणार नेतृत्व; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर :
Advertisements
आक्रोश मोर्चासाठी मराठा बांधव छत्रपती संभाजी महाराज चौकात जमण्यास सुरुवात
मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणी बरोबरच विविध मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापुरात आज रविवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच छत्रपती संभाजी महाराज चौकात मराठा बांधव जमण्यास सुरुवात झालेली आहे. यावेळी बांधवांकडून आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे असं कसे देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही, सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है ,जय भवानी ,जय शिवाजी अशा घोषणा देत येथील परिसर दणाणून गेला, या शहरात सर्व ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोणत्याही परिस्थितीत अकरा वाजता मोर्चा निघणारच
महाविकास आघाडी सरकारकडून पुन्हा एकदा मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरात विविध ठिकाणी नाकेबंदी करून मराठा बांधवासह विविध जाती धर्मातील लोकांना मोर्चा मध्ये येऊ देत नाहीत. काही झाले तरी अकरा वाजता मोर्चा निघणारच सर्व जाती धर्मातील लोकांनी मोर्चा मध्ये सामील व्हावे असे आवाहन कै. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
अण्णासाहेब आर्थिक महाविकास मंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील
Share
previous post

Related Keywords

India ,Solapur ,Maharashtra ,Jay Shivaji ,Jay Bhavani ,Narendra Patil , ,Front Maratha ,இந்தியா ,சோலாப்பூர் ,மகாராஷ்டிரா ,ஜெய் சிவாஜி ,ஜெய் பவானி ,நரேந்திர பாட்டீல் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.