July 3, 2021
12
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
पेडणे ( प्रतिनिधी )
Advertisements
मोपा विमानतळ प्रकल्प केवळ विमाने उडवण्यासाठी नव्हे, तर गावच्या, तालुक्मयाच्या आणि संपूर्ण गोव्याच्या विकासासाठी आहे. विमानतळासाठी केवळ 50 पन्नास हजार झाडे तोडली, माञ बदल्यात त्याजागी मात्र 5 लाख नवीन झाडे लावण्यात आली आहेत. जे एनजीओ गोंधळ घालतात, प्रकल्पाविरुद्ध आवाज उठवतात किंवा स्वतःला पर्यावरणप्रेमी समजतात त्यांनी किती झाडे आजपर्यंत राज्यात लावली असा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.
मोपा येथे कडशी नदीवर जलसिंचन खात्याअंतर्गत 5 कोटी रुपये खर्च करून कच्चे पाणी मोपा पठारावरील झाडांसाठी तसेच जवळच्या गावासाठी पुरवठा करण्याच्या योजनेच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते गवठणवाडा मोप येथे बोलत होते. यावेळी त्यांनी मोपा विमानतळाच्या कामाची पाहणी केली.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, जैवाविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम, माजी सरपंच पल्लवी राऊळ, नगराध्यक्ष उषा नागवेकर, माजी सरपंच जयप्रकाश परब, उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर, जलसिंचन खात्याचे अधिकारी प्रमोद बदामी, पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस देवस्थान अध्यक्ष आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी स्थानिक नागरिकांनी झाडांची नर्सरी केल्याबद्दल नागरिकांचे अभिनंदन केले.
Share
previous post