Selu Dysp Rajendra Pal Arrested In Bribe Case Parbhani
सेलू:दीड कोटीची लाच मागितली; डीवायएसपीसह दोघांना अटक, 4 दिवसांची पोलिस काेठडी
परभणी12 तासांपूर्वी
कॉपी लिंक
सेलूचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल व पोलिस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण (मानवत पोलिस स्टेशन) यांनी तक्रारदारास एका गुन्ह्याच्या अनुषंगाने दोन कोटींची लाच मागितली. तडजोडी अंती १ कोटी ५० लाखांची रक्कम मागितली. यापैकी १० लाखांची लाच तक्रारदाराच्या भावाकडून स्वीकारताना चव्हाण यांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. शनिवारी कोर्टाने अधिकारी राजेंद्र पाल आणि चव्हाणला ४ दिवसांची पोलिस काेठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या मित्राचा अपघाती मृत्यू झाल्याबाबत सेलू पोलिस ठाण्यात ३ मे २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील मृताच्या पत्नीसोबत तक्रारदाराचे मोबाइलवरील संभाषण व्हायरल झाले. दरम्यान, ९ जुलै २०२१ रोजी तक्रारदारास उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी आपल्या कार्यालयात बोलावले. तुझी व्हायरल झालेली क्लिप मी ऐकली असून यातून तुला बाहेर पडायचे असेल तर मला २ कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदारास वारंवार फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत २ कोटी रुपये लाचेची मागणी केली.
दरम्यान, राजेंद्र पाल यांच्या मुंबईतील घराची झडती घेतली असताना २४ लाख ८४ हजार रुपयांची बेहिशेबी रोकड आढळली आहे.
बातम्या आणखी आहेत...