comparemela.com


नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्यानंतर युवा यष्टिरक्षक, फलंदाज रिषभ पंत भविष्यात भारताचा कर्णधार बनू शकतो, असे भाकीत माजी अष्टपैलू युवराज सिंगने केले आहे.
यंदाच्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाने युवराज सिंग प्रभावित झाला आहे. पंत हुशार असून तो पुढे भारताचा कर्णधारपदाचा कार्यभार स्वीकारू शकेल, असे त्याला वाटते. २०१७मध्ये महेंद्रसिंह धोनीनंतर विराट कोहलीकडे नेतृत्व आहे. त्याचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून युवराजने पंतला प्राधान्य दिले आहे. “मी रिषभकडे भारताचा संभाव्य कर्णधार म्हणूनही पाहत आहे. कारण तो उड्या मारणारा, लखलखीत आणि सतत बोलणारा आहे. पण मला वाटते, की त्याच्याकडे नक्कीच चतुर मन आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी त्याने अतुलनीय काम केले. म्हणूनच, लोकांनी येत्या काही वर्षांत त्याला भारतीय संघाचा पुढील कर्णधार म्हणून पाहिले पाहिजे, असे युवराजने म्हटले आहे. २०१७मध्ये पदार्पण केल्यापासून, २३ वर्षीय पंतने सुरुवातीला टीकेचा भडिमार सहन करत संघात स्थान निश्चित केले. यंदाच्या आयपीएल हंगामात नियोजित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने पंतला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्याच्या नेतृत्वात संघाने आठ पैकी सहा सामने जिंकले.

Related Keywords

Delhi ,India ,New Delhi ,Virat Kohli ,Yuvraj Singh ,Sourav Ganguly , ,Pant India ,Bat Pant ,டெல்ஹி ,இந்தியா ,புதியது டெல்ஹி ,விராட் கோஹ்லி ,யுவராஜ் சிங் ,சோறவ் கங்குலி ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.