comparemela.com


राज कुंद्रांचं नवीन व्हॉट्सऍप चॅट व्हायरल 
Updated: Jul 21, 2021, 09:04 AM IST
मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात जर आपल्याला अटक झाली तर... या उद्देशाने राज कुंद्राने प्लान B तयार केला होता. झी 24 तासच्या हाती राज कुंद्राचं नवीन व्हॉट्स ऍप चॅट आलं आहे. यामुळे खूप मोठी खळबळ उडाली आहे. राज कुंद्रा प्रकरणाला वेगळं वळण लागणार? (Raj Kundra Porn Business Case : He make plan B, New WhatsApp Chat goes viral ) 
राज कुंद्राचं हॉटशॉट् ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून 18 नोव्हेंबरला सस्पेन्ड केलं होतं. मात्र झी 24 तासच्या हाती लागलेल्या व्हॉट्स अप चॅटवरून राज कुंद्राला अशा प्रकारची कारवाई होऊ शकते याचा अंदाज होता. त्यासाठी राज कुंद्रा आणि त्याच्या टीमनं प्लान बी तयार ठेवला होता. ऍप्लिकेशन सन्स्पेन्ड झाल्यानंतरही राज कुंद्राला कुठलाही धक्का बसला नाही. आपला प्लान बी सुरू होत आहे.
2 ते 3 आठवड्यांत नवं ऍप्लिकेशन IOS आणि अँड्रॉईडवर लाईव्ह होईल असं तो आपल्या चॅटमध्ये म्हणतो. त्यावर हॉटशॉट डिजिटलमध्ये मार्केटिंग करणारा रॉब नवं ऍप येत नाही तोपर्यंत सर्व बोल्ड फिल्म काढून टाकूयात का असं विचारतो आणि प्ले स्टोअरवरून ऍप रिस्टोर करण्याचं अपील करावं असंही म्हणतो. यामधील एक चॅट 10 नोव्हेंबर 2020 चं आहे. त्यात एक आर्टिकल शेअर केलं गेलं आहे. त्यात पोर्न कंटेट दाखवले जाणारे 7 OTT प्लॅटफॉर्म्सना समन्स पाठवण्यात आलं होतं.
त्यावर राज कुंद्राच्या चॅटमध्ये 'थँक्यू गॉड प्लान बी' असं म्हटलंय. काही काळ बोल्ड कंटेटला OTT प्लॅटफॉर्म्सवरून हटवाव्यात तसंच हॉटशॉट कायम ठेवण्यासाठी नवा मार्ग शोधावा लागेल असं म्हटलं आहे. तसंच त्या चॅटमध्ये राज कुंद्रा आपलं आयुष्य मस्त चाललंय असंही म्हणताना दिसतो आहे.
Tags:

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India ,Raj Kundra , ,Raj Plan ,Raj New ,Google Play November ,Planb Start ,November App ,Play App ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,ராஜ் குந்த்ரா ,நவம்பர் செயலி ,விளையாடு செயலி ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.