comparemela.com


नवी दिल्ली : संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार असून, १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये १९ कामकाजाचे दिवस असणार आहेत. अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.
संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. या दरम्यान, कोरोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.
अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासले जाणार आहे.

Related Keywords

New Delhi ,Delhi ,India ,Lok Sabha ,Council Of Ministers The Committee ,July Start ,Lok Sabha President ,Committee July ,புதியது டெல்ஹி ,டெல்ஹி ,இந்தியா ,லோக் சபா ,ஜூலை தொடங்கு ,குழு ஜூலை ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.