comparemela.com


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व जे. पी. नड्डा आपले नेते आहेत, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी आपल्या समर्थकांनी सादर केलेले राजीनामे फेटाळून लावले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या विस्तारात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे वा त्यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा समावेश न झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील भाजपातले त्यांचे समर्थक नाराज झाले होते. अनेक समर्थकांनी आपापल्या पदांचे राजीनामे पंकजा मुंडे यांच्याकडे पाठविले होते. दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी न मिळाल्यामुळे आपण वा आपल्या भगिनी नाराज नसल्याचे सांगितले होते. मात्र, आपले समर्थक यामुळे नाराज असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
पंकजा मुंडे भाजपा्या राष्ट्रीय सचिव आहेत. सोमवारी त्या राजधानी दिल्लीत बैठकीसाठी गेल्या होत्या. तेथे त्यांनी पक्षाध्यक्ष नड्डा तसेच पंतप्रदान मोदी यांची भेट घेतली. मंगळवारी त्या मुंबईत होत्या. येथे कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आपले मन मोकळे केले. तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे फेटाळत असल्याचे जाहीर केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरच आपल्याला केंद्रात मंत्रीपद देण्याची तयारी पंतप्रधान मोदी यांनी दर्शवली होती. परंतु आपण तेव्हाच त्याला नकार दिला होता. मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करावे, भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, याच्यासाठीच संघर्ष यात्रा
काढली. मला काही करावे म्हणून नाही. मी सत्तेची लालची नाही. कुणाला संपवून मला राजकारण करायचे नाही. माझ्या राजकारणाचा पाया काही मला संत्री करा, मला मंत्री करा, माझ्या बहिणीला काही करा, माझ्या नवऱ्याला काही करा, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत. माझा परिवार काही फक्त प्रीतम मुंडे आहे का? माझा परिवार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुंडे साहेबांवर निष्पाप प्रेम करणारा कार्यकर्ता आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India ,New Delhi ,Delhi ,Narendra Modi ,Council Of Ministers ,Central Council Of Ministers ,Prime Minister Modi ,Prime Minister Narendra Modi ,Central Council ,Beed District ,Maharashtra Corner ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,புதியது டெல்ஹி ,டெல்ஹி ,நரேந்திர மோடி ,சபை ஆஃப் அமைச்சர்கள் ,ப்ரைம் அமைச்சர் மோடி ,ப்ரைம் அமைச்சர் நரேந்திர மோடி ,மைய சபை ,தேனீ மாவட்டம் ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.