Pranav Ambardekar Writet Book Inspired By Ruskin Bond
गुरुपाैर्णिमा विशेष:रस्किन बाँड यांच्या प्रेरणेतून नववीत असतानाच त्याने लिहिले हाेते तत्त्वज्ञानावरील ‘फॉर दोज हू लाइक टू थिंक’ पुस्तक
सोलापूर / यशवंत पोपळे18 तासांपूर्वी
कॉपी लिंक
मुलाने शिकून पैसा कमवावा, नावलौकिक करावा अशीच बहुतांश पालकांची अपेक्षा असते. पैसा-नोकरी, व्यवसायासाठी बरेच पालक मुलाचा कल लक्षात न घेता त्याचे शिक्षण, व्यवसाय याबाबत निर्णय घेतात. मात्र, पैसा-प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या आयआयटी, मेडिकल किंवा अन्य शाखांमध्ये सहज प्रवेश मिळणे शक्य असतानाही प्रणव निरंजन अंबर्डेकर या तरुणाने प्रख्यात साहित्यिक रस्किन बाँड यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि प्रोत्साहनामुळे तत्त्वज्ञान विषयात करिअर करण्याचा वेगळा मार्ग स्वीकारला. यात आई गीता आणि वडील निरंजन अंबर्डेकर यांनीही प्रणवला स्वातंत्र्य दिले. आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रणव याच्या तत्त्वज्ञान क्षेत्रातील वाटचालीविषयी...
पुण्यातील विद्या प्रतिष्ठानच्या मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलमध्ये २०११ मध्ये दहावीत ९४% आणि सेंटी मेरीज स्कूलमध्ये बारावी विज्ञान शाखेत ९२% गुण मिळवलेल्या प्रणवने नववीत असतानाच ‘फॉर दोज हू लाइक टू थिंक’ हे पुस्तक लिहिले. बारावीनंतर फर्ग्युसन महाविद्यालयात तत्त्वज्ञान विषयात कला शाखेची पदवी मिळवली. मसुरी, उत्तराखंड येथे प्रसिद्ध इंग्लिश तत्त्वज्ञानाचे जगप्रसिद्ध अभ्यासक आणि साहित्यिक-कवी रस्किन बाँड यांची खास भेट घेतली. त्यानी प्रणवचे पुस्तक वाचून त्याला तत्त्वज्ञान विषयातच करिअर करण्याचे मार्गदर्शन केले. जयपूर बुक फेस्टिव्हलमध्ये नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यानीही प्रणवचे पुस्तक पाहून त्याची पाठ थोपटली होती. बुडापेस्ट, हंगेरी येथील सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटीतून तत्त्वज्ञानाची मास्टर पदवी घेतल्यानंतर आता सध्या प्रणव अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये तत्वज्ञान शाखेतील पाश्चिमात्य ज्ञानशास्त्र या विषयात पीएचडी करत आहे.
प्रत्येक देशातील एका उमेदवाराची ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये तत्वज्ञानात पीएच. डी. करण्यासाठी निवड होते. त्यानुसार प्रणव याला प्रवेशपूर्व विविध चाचण्यांचे निकष पूर्ण केल्यानंतर प्रवेश मिळाला. सोलापूरचे आजोबा धुंडिराज ताम्हणकर हे अलाहाबाद विद्यापीठातील विख्यात तत्वज्ञांनी गुरूदेव रानडे स्नेही होते. त्यामुळे गुरूदेवांच्या साहित्याचा कुटुंबावर प्रभाव आहे. त्याच्या अभ्यासातून वाचन, लेखन आणि चिंतनाची बैठक पक्की झाली असे मत प्रणव याने व्यक्त केले. रामायण, महाभारत आणि उपनिषिद या ग्रंथा साहित्याचे आणि संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई आदी संतांचे तत्वज्ञान प्रमाण मानले गेले आहे. त्याचा पाश्चिमात्य संशोधक शेकडो वर्षांपासून वाचन, लेखन आणि चिंतन करीत आले आहे. सर्वांची मांडणी वेगळी असली समाजातील मानवाचे कल्याण हे सूत्र समान आहे. या विषयामुळे देश, सीमा, पंथ, रंग किंवा लिंग कसा कसलाच भेद नसतो. केवळ मानव कल्याणाचे बीज हेच सर्व विविध देशातील तत्वज्ञानाचे सूत्र आहे, प्रणवने सांगितले.
रस्किन बाँड गुरुस्थानी
इंग्लिश तत्त्वज्ञानाचे जगप्रसिद्ध अभ्यासक आणि साहित्यिक-कवी रस्किन बाँड यांच्या विचारांनी मी प्रभावित झालो. त्यांना गुरुस्थानी मानले. तत्त्वज्ञानातच करिअर करण्याचा निर्धार केला.प्रा.गुरुदेव रानडे यांच्या साहित्याचा अभ्यास पूरक ठरला. - प्रणव अंबर्डेकर, ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका
बातम्या आणखी आहेत...