comparemela.com


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग तसेच नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य यतीन रावसाहेब कदम यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, आमदार विद्या ठाकूर आदी याप्रसंगी उपस्थित होते. भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उत्तर भारतीयांची मते लक्षात घेता भाजपकडून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. गांधी कुटुंबीयांशी त्यांचा निकटचा संबंध होता. मुंबई काँग्रेसचेही ते बराच काळ अध्यक्ष होते. उत्तर भारतीय समाजामध्ये त्यांना बराच मान आहे.

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India ,Poonam Mahajan ,Chandrakant Patil ,Cmb Assembly ,Singh Congress ,Mumbai Corporation ,Nashik District The Council ,Land Office ,Nashik District ,Wednesday India ,State Chandrakant Patil ,North Indians ,North India ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,பூனம் மகாஜன் ,சந்திரகாந்த் பாட்டீல் ,சிங் காங்கிரஸ் ,மும்பை நிறுவனம் ,நில அலுவலகம் ,நாசிக் மாவட்டம் ,புதன்கிழமை இந்தியா ,வடக்கு இந்தியர்கள் ,வடக்கு இந்தியா ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.