comparemela.com


नवी मुंबई (प्रतिनिधी) : राज्य आणि केंद्र शासनाकडून कोरोनाच्या प्रतिबंधित लसींविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्यानंतर आता लसीकरणासाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे; परंतु आता नागरिकांची संख्या जास्त आणि लसीकरणाच्या मात्रा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात वादंग माजत आहे. कोरोना लसीकरण केंद्रांवर झुंबड, हाणामारी, भांडणे व वादावादी यासारखे प्रकार नियमित होऊ लागले आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला पोलिसांना पाचारण करावे लागत आहे. दरम्यान शनिवारी चक्क ऐरोलीमधील मनपा रुग्णालयातील डॉक्टरांनी अशा भांडणांपायी स्वतःला कोंडून घेतल्याची घटना घडली आहे.
देशभरात १५ जानेवारी २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधित लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हापासून लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा प्रश्न विविध कारणांनी गाजतच आहे. प्रशासनाकडून याची योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करणे अपेक्षित होते. परंतु तसे न झाल्याने लसीकरणावरून आरोग्य प्रशासनाला अनेकदा वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी सहा दिवसांनी कोव्हीशिल्ड या लसीचा पुरवठा झाला. पण नागरिकांची संख्या जास्त आणि लसींची मात्रा कमी. त्यामुळे नवी मुंबई परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये हातघाई, वादावादी यासारख्या घटना घडल्या आहेत.
नवी मुंबई मनपा प्रशासनाला कोव्हॅक्सीन नावाची लस मुबलक मिळत असली.तरी कोव्हीशिल्ड लस नियमित मिळत नाही. मागील सहा दिवसांत कोव्हीशिल्ड लसींचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे कोव्हीशिल्ड लसींच्या प्रतीक्षेत नागरिक मोठ्या संख्येने होते. त्यातच शनिवारी कोव्हीशिल्डचा दुसरा डोस ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी २३ नागरी आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस, तीन मनपा सार्वजनिक रुग्णालये, माताबाळ रुग्णालय तुर्भे व ईएसआयएस रुग्णालय वाशी या ठिकाणी प्रत्येकी ४०० डोस उपलब्ध होणार आहेत, हे आदल्या दिवशी जाहीर झाल्यानंतर शनिवारी पहाटेपासून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली; परंतु सर्वच लसीकरण केंद्रांवर गर्दी जास्त व मात्रा कमी. त्यामुळे वाद निर्माण झाले व प्रशासनाला पोलिसांना पाचारण करावे लागले.

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India , ,New Mumbai ,Navi Mumbai ,Plus Saturday ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,புதியது மும்பை ,நவி மும்பை ,ப்லஸ் சனிக்கிழமை ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.