comparemela.com


पालघर (प्रतिनिधी) : महानगरपालिकाची सार्वत्रिक, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्यामुळे शहरी व ग्रामीण भागाच्या विकासावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. लोकांची कामे होत नसल्यामुळे लोक हैराण झाले आहेत.
वसई-विरार शहर महानगरपालिकेची मुदत गेल्या वर्षी २८ जूनला संपली. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या व प्रशासकीय राजवट लादली. त्यानंतरही परिस्थितीत फरक न पडल्यामुळे राज्य सरकारने प्रशासकीय राजवटीला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली. हा कालावधी गेल्या २८ जून रोजी संपला असल्याने सरकार आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याच्या तयारीत आहे. सध्याच्या प्रशासकीय राजवटीमध्ये लोकांची कामे होत नाहीत. अधिकारी भेटत नाहीत व लोकांच्या तक्रारीची कुठेही दाद घेतली जात नाही, असा सूर सर्वत्र उमटत आहे. त्यामुळे करदाते हवालदिल झाले आहेत.
प्रशासकीय काळात कामकाज पूर्णतः विस्कळीत झाले आहे. त्यामुळे या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, अशी मागणी करदाते करत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती पालघर जिल्हा परिषदेच्या ७ व पंचायत समितीच्या १५ मतदारसंघांत पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे इतर मागास प्रवर्गाच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागांवर लवकर पोटनिवडणुका होतील, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती, पण सरकारने त्याही पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासावर परिणाम होत आहे. कोरोना व्यतिरिक्त कोणत्याही कामाला अधिकारी प्राधान्य देत नाहीत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास या सर्व मतदारसंघातील विकासकामांवर त्याचा परिणाम होईल, असे लोकांचे म्हणणे आहे.

Related Keywords

Palghar ,Maharashtra ,India , ,Municipal Corporation ,Palghar District Councilb Panchayat The Committee ,Zila Parishad ,Palghar District Councilb Panchayat ,General Expectation ,பல்காற் ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,நகராட்சி நிறுவனம் ,ஜில பரிஷாத் ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.