comparemela.com


केशव आचार्य
स्वतंत्र भारताच्या लोकशाहीचा ज्याला अभ्यास करावयाचा आहे, तो कोणत्याही राजकीय विचारसरणीचा असला तरी त्याला भारतातील आणीबाणी पर्वाच्या, जून १९७५ ते मार्च १९७७ या सुमारे २२ महिन्यांच्या कालखंडाचा विचार करावाच लागेल.
आणीबाणीचे भीषण स्वरूप मी जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे. १२ जून १९७५ रोजी मी नेहमीप्रमाणे दुपारच्या बातम्या ऐकत होतो आणि अचानक ती सनसनाटी बातमी माझ्या कानावर आली. ‘अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात निकाल दिला आहे.’ हे ऐकल्याबरोबर मी चट्कन म्हणालो, ‘आता काहीतरी भयंकर होणार’ आणि झालेही तसेच!
इंदिरा गांधी यांनी २६ जून रोजी देशावर आणीबाणी लादली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर इत्यादी सर्व विरोधकांना तुरुंगात टाकले, कोणालाही अटक करण्याचे अधिकार पोलिसांना दिले आणि वृत्तपत्रांवर जाचक सेन्सॉरशिप लादली.
मी आणीबाणीच्या विरोधी लढणारा एक भूमिगत कार्यकर्ता होतो. आम्ही गुप्तपत्रके लिहून, त्यांच्या फोटो प्रती काढून वाटत असू, गुप्त बैठका घेत असू. दोन वेळा मी पोलिसांच्या नजरेतून कसाबसा सटकलो. आमच्याबरोबर राम नाईक (उ.प्र.चे माजी राज्यपाल), किरीट सोमय्या (मुलुंड), बबनराव कुळकर्णी, चित्तरंजन पंडित इत्यादी नेतेही होते. आम्ही गुपचूप बीबीसीवरील बातम्या ऐकत असू. आणीबाणीत माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला, म्हणून मी त्याचे नाव ‘जयप्रकाश’ ठेवले; परंतु सर्वत्र दहशत आणि भीती एवढी प्रचंड होती की, जयप्रकाश (नारायण) हे नाव घ्यायला लोक घाबरत असत. त्यामुळे काही आमंत्रित आमच्या बारशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, तर काही जण मला कानात अथवा हलक्या आवाजात सांगत, “आचार्य, तुम्ही काही दिवस सांभाळून राहा, पोलीस केव्हाही येऊन तुम्हाला मिसाखाली अरेस्ट करतील.”
सर्वत्र कमालीची दहशत असली तरी, जनतेमध्ये सुप्त असंतोष वाढतो आहे, याचा प्रत्यय आम्हाला येत होता. आणीबाणीच्या निषेधार्थ के. सी. कॉलेज, मुंबई येथे बोलावलेल्या सभेला कमालीची गर्दी झाली होती. सेन्सॉरशिपमुळे सभेचे आमंत्रण गुप्तपत्रकातून आणि ‘कुजबूज’ पद्धतीने करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश जस्टिस जे. सी. शाह होते. पुढे १९७७ साली मोरारजी देसाई सरकारने याच न्या. शाह यांच्या नावाने, इंदिरा गांधी यांनी आणीबाणीत केलेल्या अत्याचारांची चौकशी करायला आयोग नेमला. सभेत मुंबई उच्च न्यायालयाचे भूतपूर्व मुख्य न्यायाधीश एम. सी. छगला आणि सुप्रसिद्ध वकील, घटना तज्ज्ञ नानी पालखीवाला यांची अत्यंत स्फूर्तिदायक भाषणे झाली. पालखीवाला यांना इंदिरा गांधी यांनी त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील अिपलासाठी वकीलपत्र दिले होते; परंतु इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर करताच त्याचा निषेध म्हणून नानी पालखीवाला यांनी त्यांचे ते वकीलपत्र परत केले. इंदिरा गांधी यांच्या घटनाविरोधी कार्यावर सडकून टीका करणारे एक पुस्तक The Constitution defaced and defiled नानी पालखीवाला यांनी त्याच वेळी प्रकाशित केले. उपस्थित श्रोत्यांनी त्याची भरपूर खरेदी केली. मी ते पुस्तक अजूनही जतन करून ठेवले आहे.
अशा सुप्त असंतोषाच्या आणि दहशतीच्या वातावरणातच इंदिराजींनी लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. आणीबाणी उठवली नाही; परंतु निवडणूक प्रचारासाठी एकेक नेत्याला हळूहळू सोडण्यात येऊ लागले. काँग्रेसमधील इंदिरा-विरोधकांसह विविध पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन एकाच झेंड्याखाली एकच पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे सर्वानुमते ठरले. नवीन पक्षाचे नाव ‘जनता पार्टी’ आणि निशाणी नांगरधारी शेतकरी असे ठरले. या पक्षातील विविध नेत्यांच्या प्रचारसभा मुंबईत रोज ठिकठिकाणी होऊ लागल्या आणि त्यांना प्रचंड गर्दी जमू लागली. मोरारजी देसाई यांच्या गिरगाव चौपाटीवरील सभेला समुद्रकिनारा फारच अरुंंद वाटू लागला, श्रोते भाषण ऐकायला दुतर्फा रस्त्यावर अथवा पाण्यात उभे राहू लागले. शिवाजी पार्कवरील जयप्रकाश नारायण यांच्या सभेने तर गर्दीचा ‘न भूतो न भविष्यती’ असा उच्चांकाचा विक्रम केला. या सभेत अटलबिहारी वाजपेयी आणि राज नारायण (ज्यांनी इंदिरा गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली आणि त्यांच्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला भरून तेथे विजय मिळवला) यांचीही भाषणे झाली.
सभा संपल्यावर घरी जाताना पाहिले…
अनेक ठिकाणी जनता पार्टीच्या स्वयंसेवकांनी पसरलेल्या चादरींवर लोक शक्य होईल तशा १०,१०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव करीत होते. अशा परिस्थितीत निवडणुका झाल्या; इंदिरा गांधी, संजय गांधींसह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते प्रचंड मतांनी पराभूत झाले. याउलट, जनता पार्टीचे सर्व नेते प्रचंड मतांनी विजयी झाले. जनता पार्टीच्या जॉर्ज फर्नांडिस यांना तुरुंगातूनच निवडणूक लढवावी लागली, त्यांना प्रचारासाठीही सोडण्यात आले नव्हते. तरीही ते चांगल्या मताधिक्याने निवडून आले. निवडणूक निकाल बाहेर येताच लोक उत्स्फूर्तपणे फटाके फोडून दिवाळी साजरी करीत होते आणि विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढत होते.

Related Keywords

Italy ,Mumbai ,Maharashtra ,India ,Allahabad ,Uttar Pradesh ,Chittaranjan ,West Bengal ,Keshav Acharya ,Ram Naik ,Atal Bihari Vajpayee ,Morarji Desai ,Nanabhoy Palkhivala ,Indira Gandhi ,Raj Narayana ,Babanrao Kulkarni ,Indiraji Lok Sabha ,Sandeep Naik ,Jayaprakash Narayan ,Court Justice ,Sanjay Congress ,Party George Fernandes ,India Democratic ,Shivaji Park Jayaprakash Narayan ,Election Sandeep Naik ,இத்தாலி ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,அலகாபாத் ,உத்தர் பிரதேஷ் ,சித்தரஞ்சன் ,மேற்கு பெங்கல் ,கேசவ் ஆசார்யா ,ரேம் நாயக் ,அடல் பிஹாரி வாஜ்பாய் ,மோறர்ஜி தேசாய் ,இந்திரா காந்தி ,சந்தீப் நாயக் ,ஜெயபிரகாஷ் நாராயண் ,நீதிமன்றம் நீதி ,சஞ்சய் காங்கிரஸ் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.