comparemela.com


मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा धोका आता कमी होताना दिसत आहे. गुरुवारी मुंबईत ६६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका आणि उत्परिवर्तित विषाणूमुळे मुंबईत कठोर निर्बंध कायम आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसते. मुंबईतील रुग्णांचा दिवसाचा आकडा हजारच्या खाली आला आहे. त्यामुळे मुंबईवरील कोरोना धोक्याचे संकट नियंत्रणात असले तरी भविष्यात येणारी तिसरी लाट लक्षात घेता मुंबईतील निर्बंध कायम आहेत. तसेच उत्परिवर्तित विषाणूमुळे धोक्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यानेही कठोर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
पहिल्या लाटेत धुमाकूळ घालणाऱ्या वरळी कोळीवाडा, धारावी या झोपडपट्ट्यांमध्ये सध्या रुग्णसंख्या अत्यल्प आहे. पहिल्या लाटेत या भागात कोरोनाचे बरेच रुग्ण आढळले होते. मात्र आता या भागात दिलासादायक चित्र आहे.
दरम्यान राज्यात दिवसभरात ९१९५ नवे रुग्ण आढळले. तर २५२ जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात दिवसभरात ८ हजार ६३४ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ९६.०१ टक्के आहे. तर कोरोना मृत्यूदर २.०१ टक्के आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १४.५ टक्के आहे.
राज्यात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्या ४ कोटी १८ लाख ७५ हजार २१७ असून ६० लाख ७० हजार ५९९ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी ५८ लाख २८ हजार ५३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख २२ हजार १९७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात १ लाख १६ हजार ६६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आता कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मात्र मुंबईमध्ये राहणाऱ्यांना तिसऱ्या लाटेची फार चिंता करण्याची गरज नसल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. यावर्षी मुंबई शहरामध्ये १ जूनपर्यंत ८० टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन ते बरे झाले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक होण्याची शक्यता कमी आहे. मूलभूत रिसर्च करणारी देशातील प्रसिद्ध संशोधन संस्था असलेल्या टाटा इंस्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या तज्ज्ञांनी आपल्या अहवालात याबाबतची शक्यता वर्तवली आहे.

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India ,Dharavi , ,Thursday Mumbai New ,Mumbai Pete ,After Mumbai ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,தரவி ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.