comparemela.com


क्युएबा (वृत्तसंस्था) : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत सोमवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यांमध्ये अपेक्षित निकाल लागले. बलाढ्य अर्जेंटिनाने ४-१ अशा फरकाने बोलिव्हियाचा धुव्वा उडवला. पॅराग्वेने चुरशीची लढत दिली तरी उरुग्वेने १-० असा निसटता विजय मिळवला.
बोलिव्हियाविरुद्ध अर्जेंटिना सामन्यामध्ये पाच गोल झाले. पहिल्या सत्रामध्येच अर्जेंटिनाने ३-० अशी आघाडी घेत वर्चस्व घेतले. त्यानंतर उत्तरार्धात दोन गोल करत गोलांचे पंचक साजरे केले. अर्जेंटिनाचे गोल खाते सहाव्या मिनिटाला उघडले. त्यानंतर लिओनेल मेसीने ३३ आणि ४२व्या मिनिटाला दोन गोल करत आघाडी ३-० वर नेली. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये बोलिवियाने संघर्ष सुरु ठेवत दुसऱ्या सत्रात ६०व्या मिनिटाला आपला पहिला आणि सामन्यातील एकमेव गोल नोंदवला. मात्र त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी म्हणजेच सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या लाऊटारो मार्टेनिजने गोल करत दोन्ही संघांमधील गोलचं अंतर तीनवर नेऊन ठेवले.
पॅराग्वेविरुद्ध उरुग्वेचा सहज विजय मानला जात होता. मात्र पॅराग्वेने त्यांना चांगलेच झुंजवलं. पहिल्या सत्राच्या २१ व्या मिनिटाला उरुग्वेच्या एडिन्सन कवानीने मारलेला गोल हा निर्णयाक ठरला. २१ व्या मिनिटाला झालेल्या या गोल व्यतिरिक्त सामन्यात एकही गोल झाला नाही. दोन्ही संघांकडे चेंडूचा ताबा जवळजवळ समान कालावधीसाठी होता. उरुग्वेने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करत तब्बल सहा वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. तर शॉर्ट ऑन टार्गेटमध्ये पॅराग्वेचा स्कोअर शून्यच होता. बोलिव्हियावरील विजयासह अर्जेंटिनाने अ गटामध्ये अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यांत त्यांनी विजय मिळवला. एका सामन्यात ते पराभूत झालेत. दुसऱ्या स्थानावर उरुग्वे, तिसऱ्या स्थानावर पॅराग्वे संघ आहे. चौथ्या स्थानावर चिली, पाचव्या स्थानी बोलिव्हिया आहे. दुसरीकडे ब गटामध्ये ब्राझील अव्वल स्थानी आहे.

Related Keywords

Uruguay ,Chile ,Argentina ,Bolivia ,Brazil ,Republic Of Bolivia ,Argentine Republic , ,Place Union ,Place Uruguay ,Place Chile ,Place Republic ,உருகுவே ,சிலி ,அர்ஜெண்டினா ,பொலிவியா ,பிரேசில் ,குடியரசு ஆஃப் பொலிவியா ,ஆர்கெண்டைன் குடியரசு ,இடம் தொழிற்சங்கம் ,இடம் சிலி ,இடம் குடியரசு ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.