comparemela.com


श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मूत हवाई दलाच्या तळावर रविवारी करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून ड्रोनद्वारे सैन्य तळांना निशाणा बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जम्मूमध्ये सैन्य तळावर ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. हाती आलेल्या माहितीनुसार, जम्मूच्या कालुचक मिलिटरी स्टेशनवर पहाटे ३च्या सुमारास दोन संशयास्पद ड्रोन घोंघावताना आढळून आले. जवान दक्ष असल्याने ड्रोन दिसताच त्यांनी त्यावर २०-२५ राऊंड फायर केले.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पहिला ड्रोन रात्री ११.४५ मिनिटांनी, तर दुसरा ड्रोन २.४० मिनिटांनी दिसला. भारतीय सैन्याकडून फायरिंग करण्यात आल्यानंतर हे ड्रोन दिसेनासे झाले. सध्या भारतीय सैन्याकडून बेपत्ता ड्रोनची माहिती घेण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनएसजी पथक ताबडतोब जम्मूमध्ये दाखल झाले. या पथकाजवळ अँटी ड्रोन गन्स आहेत, त्याचा वापर ड्रोन पाडण्यासाठी केला जातो.
जम्मू हवाई दलाच्या तळावर शनिवारी रात्री दोन स्फोट करण्यात आले होते. पहिला स्फोट १.३७ मिनिटांनी, तर दुसरा पुढच्याच पाच मिनिटांत १.४२ मिनिटांनी घडवून आणण्यात आला. हवाईदलाच्या म्हणण्यानुसार, या स्फोटांची तीव्रता कमी होती. ज्या छतावर पहिला स्फोट झाला तिथे बरचसे नुकसानही झाले. मात्र, दुसरा स्फोट एका मोकळ्या जागी झाला. पहिल्यांदाच दहशतवाद्यांकडून ड्रोनद्वारे लष्करी तळांना निशाणा केले आहे.

Related Keywords

Jammu ,Jammu And Kashmir ,India ,Hawaii ,United States , ,Discovery Mission ,Hawaii Dal ,Jammu Military ,Jammu Military Station ,Air Force ,ஜம்மு ,ஜம்மு மற்றும் காஷ்மீர் ,இந்தியா ,ஹவாய் ,ஒன்றுபட்டது மாநிலங்களில் ,கண்டுபிடிப்பு பணி ,அேக படை ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.