comparemela.com


ठाणे (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात न्यमोकोकल काँज्युगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) या नवीन लसीचा समावेश करण्यात आला असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवार दिनांक १२ जुलै २०२१ पासून ठाणे ग्रामीण आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील नियमित लसीकरण कार्यक्रमादरम्यान सदर लसीचा समावेश करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे १ ते १० जुलै २०२१ दरम्यान प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.
ही लस न्यूमोकोकस या जीवाणूपासून होणाऱ्या न्युमोनिया, मेंदूज्वर आणि सेप्टी सेमिया या गंभीर आजारापासून बालकांचे संरक्षण करते व ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांमधील मृत्यूचे प्रमुख कारण असलेल्या न्युमोकोकल न्युमोनियापासून बालकांचे संरक्षण करते. त्यामुळे नियमित लसीकरण कार्यक्रमात बालकांना वयाच्या ६ आठवडे, १४ आठवड्यात अनुक्रमे प्रथम व द्वितिय मात्रा, तर ९ महिन्यांचे झाल्यावर बूस्टर डोस दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी दिली.

Related Keywords

Rajesh Narvekar , ,Collector Rajesh Narvekarb Ceo ,Guide Monday ,ராஜேஷ் நர்வேக்ர் ,வழிகாட்டி திங்கட்கிழமை ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.