comparemela.com


पालघर (प्रतिनिधी) : पावसाने चकवा दिल्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. येत्या दोन दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट पेलवणारे नाही. त्यामुळे हे शेतकरी सध्या आभाळाकडे नजर लावून बसले आहेत.
जिल्ह्यात शेतीची प्राथमिक कामे झाल्यानंतर पावसाने जो काढता पाय घेतला तो आजपर्यंत. ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडल्यामुळे जमीन घट्ट होऊन रोपे उगवण्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भातउत्पादन कमी येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, शेतकरी या अस्मानी संकटात सापडला असताना जिल्हा परिषदेचे अधिकारी मात्र साखर झोपेत आहेत. जिल्ह्यातील भातशेतीची अवस्था कशी आहे, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी व त्यांना आधार देणे अशा महत्त्वाच्या कामांसाठी या अधिकाऱ्यांना वेळ नाही. पाऊस अधिक काळ लांबला तर मात्र शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असा सूर ग्रामीण भागात ऐकायला मिळतो. हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत जोरदार वृष्टी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे; पण शेतकरी त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
दरवर्षी येणाऱ्या या संकटामुळे सरकारने सिंचनासाठी अन्य पर्याय उपलब्ध करावे, अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त होतील, अशी भीती व्यक्त करत आहेत.
वरुणराजाऐवजी सूर्यराजाची मेहेरबानी
कासा (वार्ताहर) : जुलै महिना हा मुसळधार पाऊसाचा महिना. या महिन्यात शेतकरीराजा भातलावणी, नागली, उडीद आदी पिके लावण्याच्या शेती कामात गुंतलेला असतो. मात्र, यंदाच्या वर्षी याच वरुणराजाची वक्रदृष्टी बळीराजावर पडली आहे.
गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाऊस गायब झाला असून जुलै महिन्यात पाऊसाऐवजी सूर्य आग ओकत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शेतातील भात, नागली, उदिड, तूर आदी पिके सुकू लागली आहेत. जुलै महिन्यात नद्या, नाले, ओढ्यांमध्ये तुडुंब पाणी भरून वाहत असते. मात्र त्यांच्यातीलही पाणी कमी झाले आहे. एका बाजूला कोरोनासारख्या आजारांनी गेल्या दोन वर्षांपासून सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. रोजगार नसल्याने हाताला काम नाही. त्यामुळे हातात पैसा नाही. या आर्थिक विवंचनेत असताना शेतकऱ्यांने महागडी बियाणे, खते, कीटकनाशके आदी कर्ज काढून विकत घेतली आहेत. मात्र, या वर्षी अवकाळी पाऊस व ऐन शेतीच्या कामावेळी पाऊसाने मारलेली दडी त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे.
गेल्या १० – १२ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी रोज आभाळातील कोरड्या ढगाकडे टक लावून पावसाची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत आहे. आज पाऊस येईल उद्या येईल, या आशेवर रोज शेतकरी आस लावून बसत आहे. मात्र, हा वरुणराजा रोज शेतकऱ्याला हुलकावणी देत आहे. शेतातील पिकांना लहान मुलासारखे वाढवत असताना, ती पीक कोमेजून जात आहेत. त्याला पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी येते, मात्र आभाळातील ढगातून पाणी पडायचे नाव घेत नाही. शेतकरी रोज आभाळाच्या ढगात पाणी पाहत आहेत, एकदाची वरुणराजा तुझी या धरणीमायची सेवा करणाऱ्या बळीराजा वर कृपा कर, हीच अपेक्षा शेतकरी राजा करत आहे.

Related Keywords

Palghar ,Maharashtra ,India ,King Bali ,District The Council ,Palghar District ,July February ,Sun Fire ,பல்காற் ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,கிங் பாலி ,பல்காற் மாவட்டம் ,ஜூலை பிப்ரவரி ,சூரியன் தீ ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.