comparemela.com


मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांना संधी देण्यात आली. राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला. ही नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर राणे यांनी आज सर्वांचे आभार मानणारे पत्र लिहिले असून आपल्या मनातील भावना त्यांनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. केंद्रीय मंत्रीपदापर्यंतच्या राजकीय वाटचालीत सर्वांचे जे प्रेम आणि सहकार्य मिळाले आहे त्याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेन काय?, असा प्रश्न स्वत:लाच करत राणे यांनी त्रिवार आभार मानले आहेत.
शिवसेना शाखाप्रमुख ते केंद्रीय मंत्री असा नारायण राणे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. या प्रवासात राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासह अनेक पदे भूषविली. काँग्रेस सोडल्यानंतर गेली काही वर्षे राणे सत्तापदापासून दूर होते. अशावेळी भाजपने त्यांना थेट केंद्रात संधी दिली असून केंद्रीय नेतृत्वाने हा जो विश्वास टाकला आहे, त्यामुळे राणे आनंदित आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राणे यांनी सर्वांनाच धन्यवाद दिले होते, त्यानंतर आता राणे यांनी एक पत्र लिहून सर्वांचे आभार मानले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाली, असे नमूद करत राणे यांनी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले. केंद्रात मंत्री झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून, मला फोन करून आणि अन्य मार्गाने माझे अभिनंदन केले व मला शुभेच्छा दिल्या. काही जणांनी देवाजवळ प्रार्थनाही केल्या. आपल्या या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो, अशा भावना राणे यांनी या पत्रातून मांडल्या आहेत. तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहोचू शकलो. भविष्यातही आपल्याकडून असेच प्रेम, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळत राहो, ही नम्र अपेक्षा. आपल्या माझ्यावरच्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. महाराष्ट्रातील सर्व नेते, हितचिंतक, मित्र व कार्यकर्ते या साऱ्यांनी दिलेले प्रेम व सहकार्य याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?, असा प्रश्न माझ्या मनात दाटला आहे, अशा हृद्य भावना व्यक्त करताना भविष्यात प्रत्यक्ष भेटू व बोलू, असे राणे यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले आहे.

Related Keywords

Shiv ,Rajasthan ,India ,Mumbai ,Maharashtra ,A Narayan Rane ,Narendra Modi ,Narayan Rane ,Department Office ,Shiv Sena Branch Head ,Maharashtra Assembly ,Minister Narayan Rane ,Prime Minister Narendra Modi ,Central State ,Pstate Travel ,ஷிவ் ,ராஜஸ்தான் ,இந்தியா ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,நரேந்திர மோடி ,நாராயண் றானே ,துறை அலுவலகம் ,மகாராஷ்டிரா சட்டசபை ,ப்ரைம் அமைச்சர் நரேந்திர மோடி ,மைய நிலை ,நிலை பயணம் ,

© 2024 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.